प्रतिनिधी गणेश तडसे पुणे जिल्हा
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत ..मोफत मिळणाऱ्या उपचारांचा लाभ तालुक्यातील नागरिकांना मिळावा यासाठी नायब तहसीलदार सरिता पाटील यांना शिवसेना आणि युवासेना यांच्यावतीने निवेदन देण्यात आले. सदर योजनेअंतर्गत नागरिकांना 1.5 ते 2.5 लाखापर्यंत मिळणाऱ्या मोफत उपचारांमध्ये कोरोनाचाही अंतर्भाव असून त्याचा थेट लाभ हा नागरिकांना मिळणार आहे. सदर योजनेच्या नोंदणीसाठी तालुक्यातील हॉस्पिटल टाळाटाळ करत असून लोकांकडून उपचाराच्या नावाखाली मोठया प्रमाणात बिले आकारली जात आहेत. तरी, याला चाप बसावा यासाठी शिवसेना-युवासेना यांच्याकडून तहसीलदारांकडे मागणी करण्यात आली आहे.
मुळशी तालुका शिवसेना-युवासेनेच्या वतीने युवासेना जिल्हाधिकारी अविनाश बलकवडे,शिवसहकार सेनेच तालुका संघटक ज्ञानेश्वर डफळ ,युवासेना तालुकाधिकारी संतोष तोंडे,सरपंच परिषदेचे सल्लागार हनुमंत सुर्वे,युवासेना प्रसिद्धी प्रमुख संदिप आमले, विभागप्रमुख शिवाजी बलकवडे, शिवसैनिक सुहास शेडगे,मयुर रानवडे, श्री गडदे, ऋषिकेश तोंडे, हर्षद खताटे उपस्थित होते.