प्रतिनिधी @ गणेश तडसे
पुणे जिल्हा- देशातील बहुसंख्य कोट्यवधी नागरिकांच्या श्रद्धेचा, अस्मितेचा, भावनिकतेचा प्रश्न असलेल्या अयोध्येतील बहुचर्चित राममंदिर उभारणीसाठीचे भूमिपूजन बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे, या भूमिपूजन सोहळ्यासाठी देशातील तमाम नागरिकांना रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो! राममंदिराची उभारणी देशातील जातीय आणि धार्मिक तेढ संपवेल, अशी अपेक्षा असल्याचे रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण म्हणाले.एकमेकांच्या जातीविषयी, धर्माबाबत गेली शंभर वर्षे द्वेष पसरवणाऱ्या मानसिकतेतून देश यानिमित्ताने बाहेर पडेल, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, दलित वादातून हजारो दंगली पेटल्या, अनेकांच्या हत्या घडल्या त्या यानिमित्ताने थांबायला हव्यात, राममंदिर बाबत न्यायलायाने दिलेला निकाल समाजातील सौदाहार्य टिकवणारा आहे. राम मंदिर उभारणीमुळे माणसा माणसामध्ये निर्माण झालेला वाद संपुष्टात येईल आणि जातीपातीच्या मुळ्या उन्मळून पडतील अशी अपेक्षा करतानाच राममंदिराची उभारणी आणि भूमिपूजन करून वाद निर्माण करणाऱ्या, देशाच्या ऐक्याला पुन्हा एकदा तडा देणाऱ्या लोकांपासून सावध रहायला हवे, असेही परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण म्हणाले.
देशभर रामाची मंदिरे आहेत, लाखोंच्या संख्येने मशिदी आहेत, बौध्द विहारे आणि असंख्य धार्मिक स्थळे असताना अयोध्येतील मंदिराच्या कारणाहून पुन्हा एकदा राजकारण आणि द्वेषकारण पोसणाऱ्या शक्तींना आणि व्यक्तींना गांभीर्याने घेण्याची गरज राहिली नाही.
"एकमेकांच्या प्रार्थनास्थळांचा आदर करणं, एकमेकांच्या धार्मिक भावनांचा आदर करणं हीच आपली शिकवण आहे, त्याशिकवणीतुन राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमाच्या आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो", असे रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण म्हणाले.
