अमरावती, दि. 4 : अयोध्या येथे पाच ऑगस्टला श्रीराम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. सध्या महाराष्ट्रात कोविड - 19 चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. ते लक्षात घेऊन पूजनाच्या निमित्ताने कुणीही नागरिकांनी एकत्र येऊन गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व साथीचे रोग कायदा 1897 चा लागू करण्यात आला आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग (सामाजिक अंतर) ठेवण्याबाबत महाराष्ट्र शासनाचे आदेश निर्गमित झाले आहेत. कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार चौकात गर्दी करणे, चौकात प्रतिमापूजनाचा कार्यक्रम यावर बंदी घालण्यात आली आहे. जर कोणी अशा प्रकारे चौकात एकत्र आल्यास त्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथीचे रोग नियंत्रण कायदा - 1897,कलम 188 भारतीय दंडविधान संहिता 1860 व इतर कलमान्वये कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे नागरीकांनी एकत्र येऊन गर्दी करून कोणत्याही प्रकारची कृत्य करु नये, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.
काही व्यक्तींकडून यानिमित्त चुकीचे संदेश प्रसारित केले जात आहेत. दि. पाच ऑगस्ट रोजी श्रीराम मंदिर भूमिपुजनाचे पार्श्वभूमिवर सोशल मीडियाद्वारे प्रत्येक चौका-चौकात (सामाजिक अंतर पाळून) श्रीराम प्रतिमेचे पुजन करावे व पूजन करण्यास येणाऱ्या प्रत्येकाने मास्क लावणे बंधनकारक आहे. असे किंवा या प्रकारचे संदेश प्रसारित होत आहेत. अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. कोरोना प्रतिबंधासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
चुकीच्या संदेशापासून सावध राहा