Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

अमरावती जिल्हा संगीत कलाकार संघाचे निवेदन

Responsive Ad Here

प्रतिनिधी @ हरीश हजारे


जिल्हा अध्यक्ष हरीश हजारे यांनी आज निवेदनाद्वारे
महाराष्ट्र राज्य शासनाला आंदोलन तसेच उपोषणास बसण्याचा इशारा

अमरावती / गेल्या पाच महिन्यापासून संपूर्ण देशात कोरोना महामारीमुळे सगळीकडे लॉकडाउन असल्यामुळे संगीत क्षेत्रातील सर्व कार्यक्रम बंद झालेले आहे तेव्हा संगीत क्षेत्रातील सर्व कलाकारावर उपासमारीची वेळ आलेली असून कलाकार हा आर्थिक संकटात सापडला आहे. कलाकार हा आपली कला प्रसारित करून जे उत्पन्न मिळेल त्यावर आपल्या कुटूंबाचा उदरनिरवाह त्यावर चालवत असतो. कलाकाराणकडे दुसरं कुठंलेहि उत्पन्नचे साधन नसल्याने आज त्याला आर्थिक परिस्थिती चा सामना करावा लागत आहे त्याकरिता  आज पुन्हा  मा. जिल्हाधिकारी साहेब यांचे मार्फत महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब  यांना निवेदन देण्यात आले कि
श्री सद्गुरू फाऊंडेशन अमरावती द्वारा संचालित अमरावती जिल्हा संगीत कलाकार संघाच्या वतीने जिल्ह्यातील 14 ही तालुक्यातील कलाकार एकूण 960 यामध्ये संपूर्ण गायक, वादक, कीर्तनकार कथाकार, नाटककार नृत्यकार, बँड्ड कलाकार हे सर्व आमच्या संघटनेचे अधिकृत सभासद आहेत. तेव्हा  संगीत कला क्षेत्रातील कलाकार  यांना शासनाकडून आर्थिक मदत तसेच शासकीय योजनेचा लाभ मिळून देण्यासाठी
आज रोजी अमरावती जिल्हा संगीत कलाकार संघाद्वारे निवेदन देण्यात आले आहे. याआधी दि 15/6/2020 रोजी सन्घटना द्वारे निवेदन देण्यात  आले होते परंतु आज पर्यन्त आम्ही दिलेल्या निवेदनार कुठली ही कार्यवाही झालेली नाही तेव्हा या निवेदनावर महाराष्ट्र राज्य शासनाने जर कारवाई केली नाही तर संपूर्ण अमरावती जिल्यातील संगीत कलाकारांच्या उपस्थिती मध्ये अमरावती जिल्हा संगीत कलाकार संघ अमरावती च्या वतीने मा. जिल्हाधिकारी अमरावती यांच्या कार्यालयासमोर   तीव्र आंदोलन तसेच उपोषना चा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. तेव्हा श्री. सद्गुरू फाऊंडेशन द्वारा संचालित अमरावती जिल्हा संगीत कलाकार संघाचे जिल्हा अध्यक्ष श्री. हरीश हजारे, जिल्हा सचिव श्री राजेश तुपोने, जिल्हा संपर्क प्रमुख पराग पादवाड, जिल्हा मार्गदर्शक श्री. भोलेश्वर जी मुदगल, जिल्हा सल्लागार प्रभाकरराव पुरी, तिवसा तालुका अध्यक्ष शीतलभाऊ मांडवगळे, मोर्शी तालुका अध्यक्ष यश यावले.
तसेच कलाकार सभासद श्री ह.भ.प. दादासाहेब उंबरकर महाराज, विशाल पांडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सदर निवेदन देण्यात आले आहे..