प्रा.सागर गाडेकर @ग्रामीण प्रतिनिधी
मागील आठवड्यात शनिवारी नागपंचमीची सुट्टी रविवारी साप्ताहिक सुट्टी सोमवारी व्यापारी अर्जावरून तर मंगळवारी आठवडे बाजार या मुळे येवला बाजार समिती चार दिवस बंद होती. तो पूर्ववत होतो ना होतो त्यातच परत सलग तीन दिवस पुन्हा म्हणजेच बकरी ईद निम्मित शनिवारी दि.०१/०८/२०२०, तर रविवारी दि.०२/०८/२०२० रोजी साप्ताहिक सुट्टी आणि सोमवारी रक्षाबंधन निम्मित सोमवारी दि.०३/०८/२०२० रोजी सुट्टी राहिल असे तिनही दिवस अंदरसुल कृषि उत्पन्न उपबाजार समिति बंद असल्याचे बाजार समितिचे सभापती श्री मकरंद सोनवने यांनी दिली.
सध्या जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा संपला असून, जुन महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासुन चाळीत साठवलेल्या कांद्याचे भाव वाढत असतानाच पावसाला पण सुरुवात झालेली असते वातावरणात थंडावा असतो त्यामुळे कांदा थोडाफार खराब होण्यास सुरुवात होते पिक पेरणीसाठी खतांसाठी भांडवलाची गरज भासते म्हणून शेतकरी कांदा विक्री साठी बाजारात आणतो, त्याने फेब्रुवारी ते मार्च महिन्यात पक्व झालेला उन्हाळी कांदा चाळीत साठवुन दोंन पैसे जास्तीचे भेटतील या आशेवर ठेवलेला असतो पण या वर्षी उलटच झाले फेब्रुवारी महिन्यात पाऊस झाला उभ्या कांदा पिकावर तो पाऊस झाल्याने, ते पाऊसाचे पाणी सुकल्यानंतरच शेतकऱ्यांनी कांदा पिक काढले निवडुन चांगला टिकाऊ माल चाळीत भरला परंतु पावसाने भिजलेला कांदा चाळीमध्ये एक महिन्यात खराब होण्यास सुरुवात झाली मार्च एन्ड पर्यंत कसेबसे १००० हजार रुपये जायचे ते नंतर लाँकडाऊन मध्ये तर मार्केटच बंद असायचे लाँकडाऊन नंतर जिवनाआवश्यक म्हणून बाजार समितीचे काम सुरू झालं तर कांदा भाव ४०० ते ८०० रुपयांच्या पर्यंत आले शिवाय ज्या भागात कोराना पेशंट सापडले तिकडचे मार्केट बंद राहण्यास सुरुवात झाली. त्यामुळे ठराविक बाजार समिती मध्ये गर्दी होत आहे आणि त्यामुळे कांदा भाव आणखी कमी होत आहे सध्या येवला बाजार समितीचे च उदाहरण घ्यायचे तर मागील आठवड्यात शनिवार नागपंचमीची सुट्टी रविवारी साप्ताहिक सुट्टी सोमवारी व्यापारी अर्जावरुन सुट्टी तर मंगळवारी येवल्यात बाजार म्हणून येवला बाजार समिती बंद ,तसेच वैजापूर मध्ये कोराना मुळे गेल्या आठ दिवसांपासून बाजार समिती बंद कोपरगाव बाजार आवारात कोराना चे कारण व तेथील कांदा बाजारासाठी शेतकऱ्यांची पसंती कमी असते कोपरगाव बाजार समितीचे शिरसगाव बाजार आवार तर बंदच आहे त्यामुळे मागील आठवड्यात फक्त अंदरसुल उपबाजार आवारातील उन्हाळी कांदा लिलाव सुरु होते सर्व साधारण पणे अंदरसुल उपबाजार आवारात उन्हाळी कांदा १०० ते २०० च्या वर टँक्टर येत नाही पण येवला वैजापूर, कोपरगाव तीनही तालुक्यातील असा सर्व कांदा अंदरसुल येथे येत असल्याने ५०० टँक्टर च्या पुढे आवक होते व्यापारी वर्गावर दबाव येतो त्यामुळे भावात मंदी येते यामुळे शासनाने सर्व बाजार समितीच्या आवारात कांदा लिलाव सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी प्रयत्न करण गरजेचं आहे तरच शेतकऱ्यांना न्याय मिळेल एकतर ५०%पुढे कांदा खराब झालाय भाव नाही त्यात बाजार समित्या बंद त्यामुळे शेतकऱ्याचे कांदे पीक वांद्यात पडले आहे शेतकऱ्यांना योग्य बाजार भाव मिळाला पाहिजे या दृष्टीने सर्व मार्केट सुरळीत चालावे जे ने करून शेतकऱ्यांचे नुकसान टळेल.

