अमरावती/प्रतिनिधी- शिवसेनेचा पाया अमरावतीत भक्कम रोवणारे शिलेदार म्हणून परिचित व आजाद हिंद मंडळ, बुधवारा चे प्रमुख पदाधिकारी सोमेश़्वर पुसतकर यांचे रविवारी रात्री 9.30 च्या सुमारास डॉ.कडू यांच्या रुग्णालयात निधन झाले. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले होते। डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली। त्यांना व्हेंटिलेटरवर श्वास देण्याचा प्रयत्न झाला. पण, अवघ्या काही वेळातच त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या निधनाची माहिती मिळताच जिल्हयातील राजकीय व सामाजिक वर्तुळात शोकलहर पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
रविवारच्या रात्री साडे आठ पश्चात सोमेश्वर पुसतकर यांच्या फुफ्फुसात अचानक वेदना जाणवल्याने त्यांना शहरातील डॉ.प्रफुल्ल कडू यांच्या रुग्णालयात तडकाफडकी दाखल करण्यात आले. परंतु काही वेळातच सोमेश्वर पुसतकर यांचे उपचारादरम्यान निधन झाल्याची माहिती डॉ.प्रफुल्ल कडू यांनी पुसतकर यांच्या परिवाराला दिली. वृत्त लिहिस्तोवर डॉ.कडू यांच्या रुग्णालयात सोमेश्वर पुसतकर यांना बघण्यासाठी येणाऱ्यांची गर्दी उसळली होती.