Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

दुध उत्पादकांच्या प्रश्नासाठी महाएल्गार

Responsive Ad Here


प्रदेश भाजपाच्या निर्देशानुसार व किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर अनिलजी बोंडे यांच्या नियोजनातून मणगाव रेल्वे मतदारसंघात विविध ठिकाणी आमदार प्रताप अडसड यांच्या नेतृत्वात करण्यात आले महाएल्गार आंदोलन. देवगाव येथे आज सकाळी सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करून केला दूध टँकर चा चक्काजाम. दुध संकलन केंद्रावरती आ.प्रताप अडसड यांनी दुध संकलीत होऊ दिले नाही व निषेध दर्शविला. यामध्ये दूध उत्पादकांनी व संकलकांनी सुद्धा सहकार्य केले गायीच्या दुधाला १० रूपये अनुदान द्या. दूधभुकटी निर्यातीला प्रतिकिलो ५० रू. अनुदान द्या. शेतकऱ्यांच्या दूध खरेदीचा दर प्रतिलिटर ३० रुपये करा. या मागण्या वरती आमदार प्रताप अडसड यांनी देवगाव व चांदूर रेल्वे येथे आंदोलन केले यावेळी तालुकाध्यक्ष, भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.