काशिनाथ शिंदे@(तालुका प्रतिनिधी)
दिनांक 1 ऑगस्ट 20 जामनेर
महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी या वर्षात महसूल प्रशासना अंतर्गत विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल नायब तहसीलदार ,अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, लिपिक, तलाठी, शिपाई, कोतवाल एकूण 11 कर्मचारी यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाच्या अगोदर जामनेर तहसील विभागातर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले व जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी जामनेर तहसीलदार अरुण शेवाळे यांच्यासह महसूल विभागातील कर्मचारी उपस्थित असून कोरोनामुळे सोशल डिस्टंसिंग चे पालन करण्यात आले.

