सतिष बोरसे
शेतमजुरांचे व शेतकरयांचे कौशल्या वाढविणेसाठी कृषि तंत्रज्ञान व्यरस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत फवारणी करतांना घ्यावयाची काळजी या महत्वाच्या विषयावर गारखेडा येथे प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला . सदरील कार्यक्रमास सभापती मा. श्री.मुकुंद न्ननवरे , जि.प. सदस्य मा.श्री.गोपाल चौधरी , शास्त्रज्ञ वैभव सुर्यवंशी , तालुका कृषि अधिकारी अभिनव माळी , बिएएसएफ कंपनी प्रतिनिधी विवेक पाटील , क्रिस्टल कंपनी प्रतिनीधी लोटन पाटील , डॉ.क्रिष्णा मराठे , सरपंच भास्कर पाटील , कृषि पर्यवेक्षक अरुण कोळी , किरण देसले , कृषि सहाय्यक गणेश बाविस्कर , किरण वायसे , आकाश पारधी , चंद्रकांत जाधव ,रमेश महाजन , गौरव बोरसे , कल्पेश पाटील इ. उपस्थित होते. सदरील कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आमा बिटीएम दिपक नागपुरे यांनी केले. सदरील कार्यक्रमात फवारणी करतांना घ्यावयाची शेतकरयांनी कोणती काळजी घेतली पाहिजे त्याबद्दल उपस्थित शेतकरयांना कंपनी प्रतिनिधी लोटन पाटील यांनी सखोल मार्गदर्शन केले व शेतकरयांनी फवारणी करतांना कोणती दक्षता घ्यावी याबाबत जि. प. सदस्य श्री. गोपाल चौधरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले फवारणी किट शेतकरनी विकत घेउन मगच शेतकरयांनी फवारणी करा असे उपस्थितांना आव्हान केले व कृषि विभागातील योजनेची माहिती व कापुस पिकावरील मित्र किडींची ओळख करुन दिली तालुका कृषि अधिकारी माळी यांनी दिली. नंतर बिएएसएफ कंपनी प्रतिनीधी विवेक पाटील यांनी औषधी कालविणे व प्रत्यक्ष फवारणी किट परिधान कशी करावी व फवारणी कशी करावी यांचे प्रात्यक्षिक शेतात करुन दाखविले.
फवारतांना ईजा झाल्यास प्रथोमचार काय करावे याबाबत डॉ. मराठे यांनी शेतकरयांना मार्गदर्शन केले . सदरील कार्यक्रमात चिकट सापळे व फेरोमेन सापळे लावण्याबाबत बिटीएम दिपकनागपुरे यांनी शेतकरयांना मार्गदर्शन केले .

