Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

धरणगाव तालुका काँग्रेस कडून तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले.

Responsive Ad Here

(सतिष बोरसे ) 

SC,ST,OBC,VJNT,SEBC,SBC या  प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 11 वि च्या प्रवेशासाठी जात  प्रमाणपत्र तसेच OBC,VJNT,SEBC,SBC  या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 11 वि च्या प्रवेशासाठी नॉनक्रिमिलियर प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याची मुदत 3 महिने ऐवजी 1 वर्ष करून द्यावे अशी मागणी काँग्रेस कडून करण्यात आली. सध्या कोरोना विषाणूमुळे निर्माण    झालेल्या परिस्थितीत जातीचे दाखले मिळवणे हे अत्यंत कठीण    काम असेल. प्रसाशन हे कोरोनाची लढाईत जुंपले आहे त्यामुळे जातीचे प्रमाणपत्र व नॉन  क्रिमिलियर देण्याचा कामात उशीर होऊ शकतो. इयत्ता 11 वि प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडे जातीचे  प्रमाणपत्र नसल्यास शाळा सोडल्याचा दाखल्यात जातीच्या उल्लेख असल्यास त्या विद्यार्थ्यास जातीनुसार आरक्षणाचा लाभ देण्यात येत  असे. सद्याची परिस्थिती लक्षात घेता या वर्षी सुद्धा हि सवलत विद्यार्थ्यांना देण्यात यावी हि मागणी पालक वर्गाची आहे. चिंतीत पालकांना दिलासा मिळावा व पाल्यांना प्रमाणपत्र उपल्बध करून देण्याची मुदत 3 महिन्यावरून 1 वर्ष करण्यात यावी अशी मागणी धरणगाव तालुका काँग्रेस कडून करण्यात आली. तसेच धरणगाव तालुक्यात 6 महिन्यापासून बंद  असलेले आधार केंद्र लवकरात  लवकर सुरु  करण्यात यावे अशी मागणी काँग्रेस कडून करण्यात आली. धरणगाव तालुका काँग्रेस कडून दिलेली मागणी तहसीलदार    देवरे साहेबांनी मान्य करून लगेच आधार केंद्र सुरु करण्याचे आदेश दिले व आजपासून धरणगाव तहसिल कार्यालयात आधार केंद्र  सुरु झाले. यावेळेस  धरणगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मा.रतिलाल चौधरी, शहर अध्यक्ष मा.राजेंद्र न्हायदे, महेश पवार,रामचंद्र माळी, विकास लांबोळे,गौरव चव्हाण, योगेश येवले व कार्यकर्ते उपस्थित