Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जागतिक महामारी च्या संकटातही शेंदुर्णीत प्रशासनाच्या नाकावर टिच्चून भरला आठवडे बाजार

Responsive Ad Here
जागतिक महामारी च्या संकटातही शेंदुर्णीत प्रशासनाच्या नाकावर टिच्चून भरला आठवडे बाजार शेंदुर्णी तालुका जामनेर प्रतिनिधी जागतिक महामारी च्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी सगळीकडे विविध उपाय योजना होत असल्या तरी पाच महिन्यानंतर शेंदुर्णीत आठवडे बाजार भरायला पूर्ववत् सुरुवात झाल्याने सगळीकडे आश्चर्य व्यक्त होत आहे
       शेंदुर्णीत काल राम जन्मभूमी  पूजन सोहळा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते मात्र पोलिस अधिकाऱ्यांनी बैठक बोलावून कोरोना च्या पार्श्वभूमीवर व शांतता सुव्यवस्थेचे कारण करीत सर्व कार्यक्रमांचे व्यापक स्वरूप रद्द करावयास लावले तसेच कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रित राहावी या करिता खाजगी डॉक्टरांनी घरोघरी जात रुग्ण तपासणी व समुपदेशनाची काम केले मात्र नगरपंचायत अधिकाऱ्यांनी शेंदुर्णीत होणाऱ्या गर्दी नवर नियंत्रण मिळविण्यात अपयश आले  शेंदुर्णीत भरणारा आठवडे बाजार हा मार्चपासून बंद आहे परंतु नगरपंचायत च्या दुर्लक्षामुळे तो काल  जागा बदलवून पहूर दरवाजासमोर भरविण्यात आला पंचक्रोशीतील ग्राहक व विक्रेते यांनीही झुंबड केली सोयगाव राज्य महामार्गावर भरलेल्या बाजारामुळे वाहतुकीचाही खोळंबा झाला अशाच कारणामुळे शेंदुर्णी ची रुग्ण संख्या दररोज वाढत आहे सदर बाजार हा सुसज्ज असलेल्या जागेत मेणगाव रोडवर गावा बाहेर भरविण्यात यावा अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे जिथे बाजार भरविण्यात आला त्याच रोड वरून नगरपंचायत ला पदाधिकारी अधिकारी व कर्मचारी जात असतात परंतु त्यांनीही त्याकडे दुर्लक्ष केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे