Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

कृती फाऊंडेशनच्या वतीने कोरोना व्हायरस - बचाव मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

Responsive Ad Here

 प्रतिनिधी गणेश तडसे  आजाराबद्दलची माहिती दुकान मालक व दुकानात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना व्हावी या अनुषंगाने कोरोना व्हायरस बचाव या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.याबाबत सविस्तर असे की कोरोनाबाबत दुकानदार व ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने कृती फाऊंडेशन, जळगांव शहर महानगरपालिका व गोलाणी मार्केट व्यापारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोनापासून करावयाचा बचाव हा उपक्रम घेण्यात आला. यामध्ये कोरोना व्हायरस विषयी विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच प्रतिबंधात्मक उपायांचीही माहिती देण्यात आली
कोरोना आजाराची लक्षणे मुख्यत: श्वसनसंस्थेशी निगडित असतात. या विषाणूचा हवेतून प्रसार होत नसून, लागण विशेषत: डोळे, नाक व तोंडाद्वारे होते म्हणून वैयक्तिक स्वच्छतेसोबतच मास्क, रूमालचा वापर नियमित करावा, जेणेकरून कोरोनापासून बचाव होईल, कोरोना आजारासोबतच इतर आजारांपासून बचाव व्हावा, नागरिकांना लक्षणे व उपाययोजनांची माहिती व्हावी, तसेच लक्षणे आढळून आल्यास बेजबाबदारपणे वागू नये, उपचारासाठी आपल्या नजीकच्या शासकीय रुग्णालयाशी संपर्क

साधण्याचे आवाहन त्यांनी केले