सतिष बोरसे
नैतिकता दाखवून चव्हाण यांनी राजीनामा द्यावा
अमळनेर - दुधाला जादा दर मिळावा यासाठी चाळीसगाव येथे महायुतीच्या वतीने दि 1आँगस्ट रोजी राज्यभर आंदोलन करण्यात आले होते चाळीसगावी देखील आंदोलन झाले या आंदोलनात खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण देखील सहभागी झाले होते मात्र आमदार मंगेश चव्हाण यांचा तोल गेला व उद्धव ठाकरे हे रिकामचोट मुख्यमंत्री असल्याचा उल्लेख त्यांनी भाषणात केल्याने याचे पडसाद राज्यभर उमटले असून अनेक शिवसैनिकांनी त्यांना मोबाईल वर कॉल करून याचा जाब विचारत निषेध केला.दि 4 ऑगस्ट रोजी अमळनेर शिवसेना, वतीने शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली या घटनेचा निषेध मोर्चा व अमळनेर शिवसेनाचा वतीने निषेध मोर्चा काढून तहसीलदार यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले तसेच आ मंगेश चव्हाणवर मानहानी चा गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यांच्या विरोधात घोषणा बाजी करून त्यांच्या प्रतिकात्मक बॅनर ला महिलांनी चप्पल मारो आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ,,सदर प्रसंगी अमळनेर शिवसेनेचे तालुकाप्रमुख विजय पाटील,शहरप्रमुख संजय पाटील,महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका सौ मनीषा परब, युवासेना उपजिल्हा अधिकारी श्रीकांत पाटील, राष्ट्रवादी कांग्रेस जिल्हा उपाध्यक्ष संजय भिला पाटील, भारतीय कांग्रेस जिल्हा महासचिव हर्षल पाटील,राष्ट्वादी काँग्रेस शहराध्यक्ष मुक्तार खाटिक, माजी अध्यक्ष बाळू पाटील, शिवसेनेचे तालुका संघटक महेश देशमुख, माजी शहरप्रमुख नितीन निळे,नगरसेवक प्रताप शिंपी, महिला आघाडी शहर संघटिका सौ उज्वला कदम,देवेन्द्र देशमुख,जीवन पवार, शेखर भावसार,बाबू परब,विनोद राऊळ, रमेश पाटील,विलास पवार,श्रीकांत शिंपी,राहुल पाटील, कलावती पाटील,सोनुबाई सोनवणे,,कल्पना भोई, संगीता माने हे शिवसेना पदाधिकारी तर राष्ट्रवादी कांग्रेस युवक जिल्हाउपअध्यक्ष गोविंदा बाविस्कर,तालुका अध्यक्ष विनोद पाटील,, सुनिल शिंपी शहरअध्यक्ष विध्यार्थी राष्ट्रवादी कांग्रेस,श्रीनाथ पाटील तालुका विध्यार्थी अध्यक्ष,सनी गायकवाड,अनिरुद्ध सिसोदे,गौरव पाटील,सारंग साळुंके सह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते,

