द्वारा आप चंद्रपूर महानगर- चंद्रपूर शासकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात 4 ऑगस्ट 2020 ला एक कंत्राटदार आरोग्य सेविकेला अतिदक्षता बाल विभागात ऑन ड्युटी असतांना चक्कर येते ती जमिनिवर कोसळते तिला तेथेच ऍडमिट करण्यात येत पण प्रॉपरली उपचारा अभावी तिचा मृत्यू होतो.सहा महिने पूर्वीं तिच्या पतीचे सुद्धा निधन झालेले आहे. या दोघांच्याही मागे तिला एक नाबालीग अपत्य आहे. त्याचे जीवन व्यवस्थित चालावे म्हणून
जेथे एका आरोग्य सेविकेचा योग्य उपचारविना मृत्यू होतो तेथे सामान्य जणांची काय तमा ? आणि म्हणून ...
आम आदमी पार्टी चंद्रपुर जिल्हा महानगर तर्फ़े सुनील रत्नाकर भोयर यांचे मार्गदर्शन व नेतृत्वात चंद्रपुर शासकीय रुग्णालय तथा मेडिकल कॉलेज चे डीन साहेबांची भेट घेऊन त्यांना त्यांचे द्वारा माननीय श्री उद्धवजी ठाकरे ,मुख्यमंत्री म.रा., मा.राजेश टोपे, आरोग्यमंत्री म.रा. आणि मा. गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांना खालील प्रमाणे मागन्यांचे निवेदन देण्यात आले.
१) मृत आरोग्य सेविका स्व संगीता ताई विश्वनाथ पाटील यांचें वारसाला दिल्ली सरकार प्रमाणे रुपये 25 लाखाची तात्काळ मदत देण्यात यावी.
२) या मृत्यूला कारणीभूत अधिकारी,डॉक्टर वर हलगर्जीपणाचा आरोप ठेऊन सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.
3) मेडिकल कॉलेज तथा रुग्णालयातील सर्व प्रकारच्या स्टाफला नियमित करण्यांत यावे.
४)सर्व प्रकारच्या व विभागातल्या स्पेशालिस्ट डॉ स्टाफला ला त्यांची खाजगी प्रॅक्टिस करण्यासाठी निर्बंध लावण्यात यावे. जेणे करून नागरिकांना शासकीय रुग्णालयात तथा मेडिकल कॉलेज ला पूर्ण वेळ देता येईल. उपरोक्त संपूर्ण कार्यक्रमात महानगरचे दुसरे उपाध्यक्ष श्री योगेश आपटे ,श्री अशोक आनंदे सदस्य, श्री अजयभाऊ डुकरे सहसचिव, श्री संदीप पिंपळकर श्रमिक विकास संघटन, श्री दिलीपजी तेलंग, सल्लागार, श्री राजेश चेडगूलवार सोशल मिडिया,श्री शाहरुख शेख,युथ विंग संयोजक,श्री राजेश विराणी,संयोजक,श्री भिवराज सोनी,श्री सुनील मुसळे इत्यादींची उपस्थिती होती. असे महानगर सहसंयोजक सुनील रत्नाकर भोयर आपल्याला कळवीत आहे.
