Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

ग्रामपंचायतच्या दुर्लक्षतेमुळे तरुणांनी केले लोकवर्गणीतून पाईपलाईन चे काम

Responsive Ad Here

किरण वाघ  @ प्रतिनिधी

 मलकापूर तालुक्यातील खडकी या गावात ग्रामपंचायतच्या नियोजन शून्य कारभारामुळे गावातील जनतेला वेगवेगळ्या समस्येला नेहमीच तोंड द्यावे लागते.  त्यामुळे जनतेला सुविधा मिळणे दुरापास्त झाले आहे,अश्यातच गावातील पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन खराब झाल्याने गावातील लोकांना घाण पाणी येत होते याची माहिती ग्रामपंचायतला देऊनही याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही .  त्यामुळे ही समस्या दूर करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते  मधुकर निकम व गावातील युवकांच्या पुढाकाराने सर्व गावकऱ्यांनी एकत्र येत 20 हजार रुपयांपर्यंत लोकवर्गणी जमा केली व गावकऱ्यांनी स्वतः श्रमदान करीत नादुरुस्त पाईपलाईन दुरुस्त केली व या समस्येतुन मार्ग काढला

       याकामी प्रामुख्याने दिलीप थाटे, अजय निकम ,शालीक निकम, योगेश निकम, दीपक खराटे, सुकलाल शिंदे, अमोल पाटील, योगेश तायडे, व गावकऱ्यांनी सहकार्य केले.