Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

चौधरी यांना शासनाचा उत्कृष्ट पोलीस पाटील पुरस्कार.

Responsive Ad Here

प्रा.सागर गाडेकर@ग्रामीण प्रतिनिधी 6 ऑगस्ट 2020

 पाटोदा.वार्ताहर :- ऑगस्ट 2019 ते जुलै 2020 या काळामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल, पाटोदा येथील कर्तव्यदक्ष पोलीस पाटील मुज्जमील चौधरी यांना महसूल दिनी नाशिक जिल्हा उत्कृष्ट पोलीस पाटील पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागातर्फे क्षेत्रीय स्तरावर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कोतवाल पासून तर उपजिल्हाधिकारी पदापर्यंत कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा महसूल दिनी गौरव केला जातो. यामध्ये प्रथमच येवला तालुक्याला पाटोदा गावचे कर्तव्यदक्ष पोलीस पाटील मुज्जम्मिल चौधरी यांच्या रूपाने हा बहुमान भेटला. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तलाठी, लिपिक, तहसीलदार, नायब तहसीलदार अशा विविध स्तरावर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव केला जातो. ज्यायोगे त्यांनापुढील कार्य उमेदीने करण्यास प्रेरणा भेटेल व इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांना ही त्यांच्याकडून प्रेरणा भेटेल. परंतु यावर्षी करोणाच सावट असल्यामुळे निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी हा सन्मान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून स्थानिक प्रांत व तहसीलदार यांच्या उपस्थितीत बहाल करण्यात यावा असे सूचित केले होते. त्यानुसार आज 3 ऑगस्ट रोजी येवला तहसिल कार्यालयात पोलीस पाटील मुजमील चौधरी यांना येवला तालुका उपविभागीय अधिकारी दीपक कासार यांच्या हस्ते येवला तालुका तहसीलदार रोहिदास वारुळे, नांदगाव तालुका तहसीलदार उदय कुलकर्णी, पुरवठा अधिकारी हावळे, नायब तहसीलदार बुरूगळे, येवला तालुका महाराष्ट्र राज्य गाव कामगार संघटना कार्यकारी अध्यक्ष मारुती पिंगट, बाभुळगाव येथील पोलीस पाटील नंदकिशोर जगताप, रशिद पटेल यांच्या उपस्थितीत हा सन्मान व्हिडीओ कॉन्फरन्सिंग च्या साह्याने बहाल करण्यात आला. या सन्मानास पात्र होण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन, स्थानिक पातळीवरील सर्व शासकीय, गैरशासकीय यंत्रणा, तालुका व जिल्हा पातळीवरील सर्व महसूल यंत्रणा व पोलीस यंत्रणा तसेच महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटना अध्यक्ष चिंतामण पाटील मोरे व स्थानिक येवला तालुका पोलीस पाटील संघटना तालुका अध्यक्ष भगवान सावळे, येवला तालुका ग्रामीण चे पोलीस निरीक्षक अनिल भवारी व मनमाड उपविभागीय अधिकारी समीर सिंग साळवे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. तसेच हा सन्मान जन्मदात्या आई वडिलांना अर्पण करतो असे मत पोलीस पाटील चौधरी यांनी व्यक्त केले.