अमरावती @हरीश हजारे
आरोग्य विभाग जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत पंचायत समिती भातकुली चे
गट विकास अधिकारी डॉ.जस्मिन शेख यांनी संपूर्ण तालुक्यामध्ये
आरोग्य जनजागृती अभियान राबविण्याकरिता दिले अधिकाऱ्यांना निर्देश
भातकुली / येथील पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी डॉ.जस्मिन शेख यांनी आज तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत च्या ग्राम विकास अधिकारी, आरोग्य अधिकारी यांना आरोग्य अभियान प्रत्येक गावात राबविण्याकरिता निर्देश दिले तेव्हा त्यांनी नागरिकांनी कोरोना पासून बचाव करण्यासाठी काय उपाय योजना तसेच सोशल डिस्टनसिंग चे पालन करणे मास्क वापरने किंवा तोंडाला रुमाल लावणे सॅनिटायझर चा उपयोग करणे हात स्वच्छ धुणे तसेच व्यवसाय दुकानादारानी सुद्धा ग्राहक यांना शासनाच्या नियमाचे पालन करण्यासाठी सांगणे ग्राहका पासून तिन फुटाचे अनंर ठेवणे कारण नसताना दुकानातील वस्तूंना स्पर्श न करणे तसेच नागरिकांनी आपल्या मोबाईल मध्ये आरोग्य ऑप डाउनलोड करणे आणि त्याचा प्रभावी वापर करणे अश्या प्रकारे सर्व नागरिकांनी स्वतः काळजी घेतल्यास कोरोनापासून बचाव होईल आणि आपल्या गावामध्ये कोरोना रुग्ण नव्याने होणार नाही याकरिता आरोग्य विभाग जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत भातकुली तालुक्यातील संपूर्ण गावामध्ये आरोग्य जनजागृती अभियान येत्या सहा तारीखेपासून राबविण्यात येणार आहे अश्या प्रकारे गटविकास अधिकारी डॉ.जस्मिन शेख यांनी सांगितले आहे तेव्हा मा श्री. प्रमोद तेलग विस्तार अधिकारी तथा प्रशासक ग्रामपंचायत गणोजा देवी, मा. श्री. प्रभाकर तीनखेडे आरोग्य विस्तार अधिकारी, मा. श्री. राजेंद्र धरमठोक ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत गणोजा देवी तसेच पंचायत समिती येथील सर्व अधिकारी यावेळी उपस्थित होते....

