सागर गाडेकर@ग्रामीण प्रतिनिधी 11 ऑगस्ट 2020
येवला पंचायत समितीचे सभापती प्रवीण गायकवाड यांनी आदिवासी बांधवांना आदिवासी जागतिक दिनाच्या दिवशी वन जमिनीचे सातबारा उतारे वाटून मोठ्या उत्साहाने हा दिवस साजरा केला. आदिवासी कसत असलेल्या शेतातच आदिवासी दिन जमिनीचे सातबारा वाटून मोठ्या उत्साहाने साजरा केला. गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या उदरनिर्वाहासाठी कसत असलेल्या आदिवासी जमीन आपल्या नावावर व्हाव्यात यासाठी आदिवासी बांधव शासनाकडे पाठपुरावा करत होते. परंतु सभापती प्रवीण गायकवाड यांनी 2012 ला जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवड झाल्यानंतर वन जिल्हा समितीवर त्यांची निवड झाली. तेव्हापासून आदिवासी बांधवांच्या कागदपत्रांची पूर्तता करून वन समितीवर वारंवार पाठपुरावा करून येवला, नांदगाव, निफाड, चांदवड, मालेगाव, देवळा या बिगर आदिवासी तालुक्यातील आदिवासी बांधवांना न्याय देण्यासाठी मोठ्या प्रमाणात वेळ देऊन पाठपुरावा केला.त्याचे फलित आज जागतिकआदिवासी दिनाचे औचित्य साधत या बांधवांना मिळाले आहे. त्यांच्या जमिनीचा सातबारा देताना उत्साहानेआदिवासी दिन साजरा केला. येवला तालुक्यातील खरवंडी ,देवदरी परिसरातआदिवासी बांधव वन जमीन कसत आहे. उतारे वाटप थेट शेतात जाऊन एकलव्य प्रतिमेचे पूजन करत सभापती प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते आदिवासी बांधवांना वनजमीनीचा पट्टा व सातबारा वाटप करण्यात आला. याप्रसंगी आदिवासी बांधवांनी आपल्याला जमीन मिळाल्याचा आनंद साजरा केला. ज्या आदिवासी बांधवांच्या वन जमिनी अजून प्रलंबित आहे किंवा नामंजूर झाले आहेत अशा बांधवांना वन जमिनी मिळवून देण्यासाठी गायकवाड शासनाकडे प्रयत्न करणार आहे. आदिवासी बांधवांनी येवला प्रांत कार्यालयात आपले कागदपत्राची पूर्तता करून द्यावी. ज्या आदिवासी बांधवांच्या जमिनी मंजूर झाले आहेत त्या सर्व आदिवासी बांधवांनी पंचायत समितीमध्ये विविध शासनाच्या योजनाचा लाभ घ्यावा.येवला तालुक्यातील अंगुलगाव , खरवंडी देवदरी, तळवाडे, धामणगाव, ममदापूर, रहाडी, रेंडाळे, तळवाडे, कानडी ,नायगव्हाण आदी गावातील आदिवासी बांधवांच्या जमिनी मंजूर झाले आहे. तसेच रोजगार हमी अंतर्गत 15 ऑगस्टच्या पुरवणी आराखडा मध्ये विहीर, रस्ते ,गाय, गोठे, गोट फार्म असे योजनांचा पंचायत समिती मधून लाभ घ्यावा असे आव्हान याप्रसंगी प्रवीण गायकवाड यांनी केले.याप्रसंगी विविध मान्यवर उपस्थित बाळासाहेब मोरे, विष्णू मोरे, अर्जुन गोदावरे, भाऊसाहेब गोदावरे, संजय मोरे, संतोष मोरे, लक्ष्मण मोरे, विठ्ठल हंबरेआदी सह आदिवासी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

