छात्रशक्ती राष्ट्रशक्ती....!
आज संपूर्ण भारतवर्षा मध्ये भाऊ बहिणीचे नात सांगणारा उत्सव म्हणजे रक्षाबंधन या औचित्यावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा वरोरा तर्फे स्थानिक वरोरा पोलीस स्टेशन या ठिकाणी रक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात आला व या निमित्य पोलीस निरीक्षक, व पोलीस कर्मचाऱ्यांना ThankYouWarriors या संकल्पनेतून व एक राखी विश्वासाची, राखी आपुलकीची, राखी कर्तृत्ववाची, राखी रक्षणासाची, या संकल्पनेतून सॅनिटायजरने हात स्वच्छ करून राखी बांधून ओवाळून व मिठाई वाटप करून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रकारे अभाविप च्या विद्यार्थ्यींनी कार्यकर्त्यांनी रक्षाबंधन सण साजरा केला. या मध्ये नियमाचे पालन करून सामाजिक अंतर ठेवून, मास्क लावून, सॅनिटायजर चा वापर करत रक्षाबंधन कार्यक्रम पार पाडला. या वेळी वरोरा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री उमेश पाटील सर यांनी अभाविप च्या विद्यार्थ्यींनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले व रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी अभाविप वरोरा शाखा नगरसह मंत्री कु. समीक्षा इंगळे, विद्यार्थ्यींनी प्रमुख दिव्या वाणी, त़ृप्ती गिरसावळे, अक्षता माहुरे, वैष्णवी गेडाम, ऋतुजा भोयर, उपस्थित होते. तर या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शकिल शेख, कुणाल घुमे, धीरज घुमे , अंकित मोगरे, कौशिक घोरपडे, लोकेश रुयारकर, रवी शर्मा, हिमांशू घोरपडे, यांनी अथक परिश्रम घेतले.
