Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

शिवसेना पदाधिकाऱ्यांची कोविड सेंटरला भेट रुग्णांना जोशींदा काढाचे केले वाटप

Responsive Ad Here

    सावळदबारा ( प्रतिनिधी )  सोयगाव तालुक्यात देव्हारी येथील दि.४/८/२०२० मंगळवार रोजी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्या सुचनेने शिवसेना पदाधिकाऱ्यांनी देव्हारी येथील कोविड सेंटरला भेट दिली . व येथील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी , सफाई कामगार तसेच दाखल रुग्णांना रोग प्रतिकार शक्ती वाढिसाठी जोशिंदा काढयाचे वाटप करण्यात आले.
      देव्हारी येथील कोविड सेंटर मध्ये आजपर्यंत जामठी -1 व देव्हारी -48 असे एकूण 49 पॉजिटीव्ह रुग्ण दाखल आहे. ना. अब्दुल सत्तार यांच्या सूचनेनुसार सोयगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये तसेच कोरोना बाधित गावात निर्जंतुकीकरणासाठी सोडियम हायपोक्लोराईड ची नियमित फवारणी करण्यात येत आहे. सोबतच ना. अब्दुल सत्तार मित्र मंडळाच्या वतीने लॉकडाउनच्या पहिल्या आठवड्यापासून रुग्णांना रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. ना. अब्दुल सत्तार यांच्या सुचनेने शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कोविड सेंटर ला भेट देऊन तेथील उपलब्ध डॉक्टर व आरोग्य सुविधेची पाहणी केली. यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख राजेंद्र राठोड, माजी सभापती धरमसिंग चव्हाण, खरेदी-विक्री संघाचे माजी सभापती शिवाप्पा चोपडे, गणेश खैरे, शेख बबलू आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.