Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

भारतीय महिला फेडरेशन शिवणी रसूलापूर च्या वतीने हाथरस सामूहिक बलात्कार व हत्याकांडप्रकरणी तीव्र निषेध व्यक्त करून श्रद्धांजली देण्यात आली. व तहसीलदार यांना निवेदन

Responsive Ad Here

प्रदीप रघुदे प्रतिनिधी नांदगाव खंडेश्वर

हाथरस (उत्तम उत्तर प्रदेश) येथील पीडितेवर सामूहिक बलात्कार व हत्याकांड प्रकरणाचा भारतीय महिला फेडरेशन शाखा -शिवणी रसूलापूर ता. नांदगाव खंडेश्वर च्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. व गावातून मिरवणूक काढण्यात आली योगी सरकार विरुद्ध घोषणा देऊन रोष व्यक्त करण्यात आला.याप्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा द्यावी व समाजात अशा घटना घडू नये यासाठी शासनाने नव्याने पावले उचलावीत. भारतीय महिला फेडरेशनच्या वतीने 1 ऑक्टोबर२०२० रोजी निषेध दिन  पाळण्यात आला. पीडितेला  न्याय द्या पीडितेच्या, हत्येची न्यायालयीन चौकशी करा,अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची कडक  अंमलबजावणी करा, पीडितेच्या कुटुंबीयांना संरक्षण द्या,फास्ट ट्रॅक कोर्ट मार्फत पीडितेच्या हत्येचा खटला चालवा आणि  त्वरित न्याय द्या,हाथरस संबंधित पोलीस अधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांच्यावर कारवाई करा,दलित, आदिवासी,भटकेविमुक्त महिलांना संरक्षण देण्याच्या उपाययोजना करा, उत्तर  प्रदेशच्या योगी सरकारचा निषेध असो,योगी सरकार राजीनामा द्या.

पीडितेच्या कुटुंबीयांना 10 लाख रु ची मदत तातडीने द्या.आदि मागण्या घेऊन तहसीलदार साहेब नांदगाव खंडेश्वर यांना निवेदन सादर करण्यात आले.यावेळी भारतीय महिला फेडरेशनच्या जया मंडवधरे, चित्रा वंजारी, दिक्षिता तऱ्हेकर , प्रतीक्षा ढोके, राधा वासनिक, सोनाली वैद्य, सुनंदा ढोके, ज्योती बनसोड,  सुरेखा ढोके, रत्‍नाबाई ढोके, ज्योती बनसोड,  कोकिळा ढोके, रूपाली राजकुळे, शुभांगी मरगडे,  सुषमा राजकुळे,  नंदा  ढोके, पूनम रहीराव, पायल मंदुरकर,  वेदिका मरगडे, सानिका शिंदे. इत्यादी कार्यकर्त्या व विद्यार्थीनि मोठया प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.