Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

सावरगाव झरंडी रस्त्यावर केलेले अतिक्रमण हटविण्यात यावे

Responsive Ad Here

योगेश नागोलकार ता.प्रतिनिधी:पातूर

राहेर: पातूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात तसेच अकोला जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेले वसाली, सावरगाव, झरंडी, येथील गावठाणाचे अतिक्रमण हटविण्याची मागणी करित ग्रामस्थांनी संबधितांकडे वारंवार तक्रार केल्या; परंतु संबंधितांकडून ग्रामस्थांच्या तक्रारीकडे हेतूपुरस्पर दुर्लक्ष करित असल्याचा आरोप वसाली, सावरगाव,झरंडी,येथील ग्रामस्थांकडून होत आहे.

वसाली,सावरगाव,रस्त्यावर झरंडी गावाजवळील झरंडी येथील काही लोकांची अतिक्रमण करुन वर्षानुवर्षे वहीतीचा रस्ता बंद केल्याचा आरोप पंजाब राठोड,सुभाष राठोड,योगेश जाधव, मधुकर जाधव,रामदास  लढाळ,रामराव डाखोंरे,हरिंसिंग राठोड,आदींनी संबधितांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.सदर अतिक्रमण जवळपास एक एकराच्या वर आहे.गावकऱ्यांनी वारंवार तक्रारी केल्या;परंतु संबंधितांकडून त्याची अद्यापही दखल घेतली गेली नाही उलट तक्रारकत्यांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहे.एक तर वसाली,सावरगाव, झरंडीसारख्या दुर्गम भागात असलेले गाव विकासापासून कोसो दूर आहे.रस्त्याची कामे सुरु आहेत.ती कामे शासनातील संपर्काचा प्रभाव वापरून थांबवली जातात.

या अतिक्रमण करणाऱ्यांनी रस्त्यावर शासकीय हद्दीत तारांचे कुंपण उभारले असून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्त्याच्या डांबरीकरणामुळे काम थांबविले आहे.त्यामुळे संबधितांनी त्वरित दखल घेऊन सदर अतिक्रमण मोकळे ग्रामस्थांची मागणी होत आहे.