देवानंद नेमाने तालुका प्रतिनिधी नांदुरा
नांदुरा तालूका काँग्रेस कमिटीच्या वतीने मलकापुर मतदार संघाचे आमदार राजेशजी एकडे यांच्या नेतृत्वात भारत सरकारने शेतकरी विरोधी कायदे करून शेतकऱ्यांना देशोधळीस लावले आहे.त्याच प्रमाणे देशातील सुशिक्षित बेरोजगार कामगारांवर देखील उपासमारीची वेळ आली आहे.शेतकरी व कामगारांच्या विरोधात कार्य करणाऱ्या मा.नरेंद्र मोदी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.आज राष्ट्रपीता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्त शेतकरी व कामगार विरोधी दिवस पाळून जाहीर निषेध करीत व त्याकरीता आज तहसिल कार्यालया समोर धरणे आंदलोन करन्यात आले आणि त्यानंतर मा.तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी नांदुरा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.भगवान भाऊ धांडे,नांदुरा तालुका महिला अध्यक्ष सौ.सुनीता ताई गोंड,किसान काँग्रेस सेल चे तालुका अध्यक्ष सचिन पाटील येरळीकर,काँग्रेस मागास्वर्गीय सेल चे तालुका अध्यक्ष अर्जुन ब्राह्मणे, प्रा.गजानन बावस्कार,पुरुषोत्तम झाल्टे,प्रसाद पाटील,जयप्रसाद राजपूत,रवींद्र राणे,ज्ञानेश्वर डामरे, संतोष ब्राह्मणे,त्रंबक तांगडे पाटील सर,अतुल पाटील, आकाश
वतपाळ, प्रशांत बाप्पू देशमुख,शुभम लांडे, सुनिल पाटील,विजय ढोले, रमेश कांडेलकर, संतोष लाहुडकर, कैलास नामगे,डिगंबर लाहुडकर, प्रशांत देशमुख,अनिल देशमुख, अमोल तांदळे,जावेद खान आखील खान मास्टर,श्रीकृष्ण झाल्टे,पप्पू गाडेकर, एन.ओ.कांडेलकर,डी.ओ.मुकुंद, शंकर बोदवडे,राजेंद्र चांभारे, किसन चांभारे,गजानन वानखेडे, केशव मापारी,संदीप देशमुख, सचिन पाटील,उदय सरोदे,राजू हिवाळे,त्रंबक पाटील,गजानन पाटील,प्रभाकर इंगळे,जयसेन सरदार,शालीग्राम तांगडे, सुरेश लाहुडकर हे उपस्थीत होते.

