सज्जाद शेख तालुका प्रतिनिधी लोणार
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत स्तरावर शासनाने ठरवून दिलेल्या आपले कुटुंब आपली जबाबदारी या अनुषंगाने प्रत्येक ग्रामसेवक आपल्या आपल्या स्तरावर काम करत आहे परंतु तलाठी संघटनेने केलेला आरोप बिनबुडाचे असून चुकीचा आहे असा आरोप ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष मोतीराम डव्ह्ळे यांनी बि डी ओ याना दिलेल्या निवेदनातून केला आहे .
काही तलाठी हे ग्रामसेवकाच्या संपर्कात नाही ग्रामसेवक हे संवर्ग कामाच्या बाबतीत काम करण्यास तयार आहेत परंतु त्यांनाही कोणते सहकार्य मिळत नाही आम्ही सुध्दा शेतकरी पुत्र असून शेतकऱ्याच्या व्याथाची जाणीव आम्हाला सुधा आहे असे निवेदनात नमूद केले आहे तलाठी यांच्याजवळ शेतकऱ्यांचे रेकॉर्ड आहे त्यामुळे आमच्यापेक्षा त्यांना जास्त माहिती असल्यामुळे आम्ही त्यांना सहकार्य करण्यास तयार आहोत असे निवेदनात नमूद केले आहे या निवेदनावर ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष मोतीराम ड व्हळे सचिव लक्ष्मण जायभाये व इतर ग्रामसेवकांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले.