Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

विकास पवार यांना कोरोना योद्धा सन्मान पत्र बहाल

Responsive Ad Here

नयन खरात मेहकर

जागतिक महामारी कोरोना या रोगाने सर्व जगा मध्ये थैमान घातले ले असताना,अश्या कठीण परिस्थितीत आपल्या जीवाची पर्वा न करता माझे गाव माझे कुटुंब या भावनेतून महर्षी बाबा आमटे आरोग्य सेवा संस्थेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते विकास पवार यांनी कोरोना रोगाचा फैलाव रोकण्यासाठी आपल्या नगरा मध्ये कोरोना रोगाबाबत जनजागृती मोहीम हाती घेऊन घरोघरी जाऊन लोकांना या रोगांच्या संसर्गापासून कसे दूर राहता येईल या बाबत जनजागृती करून लोकांना आपल्या स्व खर्चातून डेटॉल हँड वाँश सेनिठायझर मास्क या किट चे वाटप करून कोरोना रोगाचा संसर्ग टाळण्यासाठी डेटॉल हँड वाँश सेनिटायझर मास्क या गोष्टीचा दैनंदिन जीवनात वापर 

करण्याचे महत्त्व लोकांना पटवून देऊन लोकांमध्ये या बाबत जनजागृती केली. कोरोना काळामध्ये लोकांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत असताना आपल्या गावी जाणाऱ्या वाट सरूना अल्पोहार व जेवणाची व्यवस्था करून खऱ्या अर्थाने माणुसकी जपली व हे सामाजिक कार्य करीत असताना कोणतीही प्रसिध्दी या कार्याची होऊ दिली नाही.या सामाजिक कार्याची दखल दिव्या फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष अशोक जी काकडे यांनी घेऊन महर्षी बाबा आमटे आरोग्य सेवा संस्थेचे 

अध्यक्ष विकास पवार यांना दिव्या फाउंडेशनच्या वतीने कोरोना योद्धा सन्मान पत्र मेहकर पंचायत समितीचे सहायक बिडियो श्री गजानन जी पाटोळे यांचा हस्ते प्रदान करण्यात आले.तसेच कोरोना योद्धा सन्मान पत्र मिळाल्या बद्दल  मेहकर नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष कासम भाई गवळी यांनी देखील सामाजिक कार्यकर्ते विकास पवार यांचा नगर परिषदे मध्ये सत्कार केला.या वेळी बार्टी चे समतादुत तथा दिव्या फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक मोहसीन खान बिस्मिल्ला खान,सरपंच अरुण दळवी, शेख शाकीर भाई,उमेश पवार,आकाश पवार,मनोज इंगळे इत्यादी उपस्थित होते.