Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

माणुसकी समूहातर्फे पहुर पोलीस स्टेशनच्या टीमला कोरोना योद्धा सन्मान सु-लक्ष्मी सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम

Responsive Ad Here

काशिनाथ शिंदे @तालुका प्रतिनिधी जामनेर



पहूर ता जामनेर येथील पोलीस स्टेशनचे एपीआय राकेश सिंग परदेशी यांच्या टीमने कोरणा या महाभयंकर आजाराने थैमान घालत असताना रात्रंदिवस गस्तीवर राहून गोरगरीब लोकांची सेवा केली , लोकांमध्ये प्रत्येक गावात जाऊन नागरिकांमध्ये बद्दल माहिती देण्यात आली. स्वतःच्या जीवाची काळजी न करता आणि सेवा केल्याबद्दल माणुसकी रुग्णसेवा समूह यांच्यावतीने कोरोना योद्धा सन्मान संपूर्ण पोलिस स्टेशन टीमला देण्यात आला. यावेळी एपीआय राकेश सिंग परदेशी यांनी माणुसकी समूहाचे समाजकार्य जाणून घेतले व कार्याचे कौतुक केले . यावेळी माणुसकी ग्रूप जळगाव जिल्हाध्यक्ष समाजसेवक गजानन क्षीरसागर, डॉक्टर काशिनाथ माळी ग्रुप सदस्य हजर होते ,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर जितेंद्र वानखेडे सर यांनी केले व आभार डॉक्टर संदीप कुमावत यांनी मानले.