किरण वाघ प्रतिनिधी बुलढाणा
हाथरस जिल्ह्यातील सामूहिक बलात्काराच्या प्रकरणावरून देशभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे महाराष्ट्रात ही या घटनेचे पडसाद उमटताना दिसत आहेत. मलकापूर येथे आज राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष धनश्रीताई काटीकर पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय समाज पक्ष, अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल , भैरव फौंडेशन महाराष्ट्र, अहिल्या सरकार संघटना तर्फे या घटनेचा तीव्र निषेध करत पीडितेला न्याय देऊन आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी तहसीलदार मलकापूर यांच्यामार्फत प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना करण्यात आली .महिलांवर होणारे अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढत असून शाळा महाविद्यालयात जाणाऱ्या मुली असोत की कार्यालयात काम करणाऱ्या महिला कोणीच सुरक्षित राहिलेला नाही महिला अत्याचाराची प्रकरणे आपले राजकीय बळ वापरून किंवा अधिकारी वर्गांना मॅनेज करून आरोपी निर्धास्त पणे फिरताना दिसतात काहींचे खटले सुद्धा दाखल होत नाही काहींचे होतात तर त्याला अटकपूर्व जामीन मिळतो व नंतर सुरू होते वर्षानुवर्षे चालणारी तारीख निर्भया प्रकरण खटला सात ते आठ वर्षे कोर्टात सुरू होता . महिलांवर होणारे अत्याचारला कायद्याचा दुबळेपणा कारणीभूत ठरत आहे . वर्षानुवर्षे चालणारे कोर्टाचे खटले आरोपींना एक प्रकारे सहकार्य करत असतात. उत्तर प्रदेशातील मागासवर्गीय युवतीचा अमानुषपणे अत्याचार करून तिची जीभ कापण्यात आली या आधी देशात घडलेल्या महिला अत्याचाराच्या आरोपींना कठोर शिक्षा झाली असती तर कदाचित असे प्रकार घडले नसते पीडित युवती व तिच्या परीवाराला संरक्षण देण्याऐवजी पोलिस प्रशासनाने आरोपींना एक प्रकारे मदत केल्याचे आतापर्यंत दिसून आले. हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाचा तपास सीबीआय कडे देऊन या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी तसेच पोलिस प्रशासनातील दोषी अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करावी. आपल्या मागण्यांचे निवेदन मलकापूर तहसील प्रशासनामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे.
उत्तरप्रदेशमधील हाथरसमध्ये दलित तरुणीवर निर्भयासारखे क्रूर कृत्य केल्याची घटना उघड झाल्यानंतर राजकारण तापलं आहे. सोशल मीडियावरून नागरिकांचा आक्रोश दिसून येत आहे. तसेच हाथरस येथील घटनेचा विविध संघटनांकडून निषेध करण्यात येत असून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत आहे.
याप्रसंगी धनश्रीताई काटीकर पाटील, अर्जुन ढोलकर प्रेसिडेंट, दत्तू टाक, हुकुमचंद धांडोरे अध्यक्ष अभासमको, गोकुळ रानवे उपाध्यक्ष , राजेश झाझोट, गणेश टाक, संतोष चंदाले, कुणाल ढोलकर, राष्ट्रीय जनता दल, राजेंद्र झाझोट, सोनू करोसिया, प्राध्यापक प्रकाश थाटे, सय्यद ताहेर, रोशन वाकोडे ,असंख्य जनसमुदाय उपस्थित होता
