योगेश नागोलकार पातूर तालुका प्रतिनिधी
पातुर तालुक्यातील पिंपळखुटा येथील हायस्कूल येथील तांदूळ चोरी चौकशी समिती अहवाल हा चोरांच्या उलट्या बोंबा असल्याचा आरोप प्रहार सेवक अरविंद घोगरे पाटील यांनी पातुर येथील एका पत्रकार परिषदेमध्ये केला असून सदरचा चौकशी अहवाल संशयाच्या भोव-यात असल्याचे म्हटले आहे शालेय पोषण आहार अधीक्षक वर्षा कल्याणकर ह्या 13 सप्टेंबर रोजी पिंपळखुटा येथे चौकशीसाठी गेले असता मुख्याध्यापक संदीप चव्हाण व प्रयोगशाळा परिचर खोडके हे 29 सप्टेंबर पर्यंत रजेवर होते त्यामुळे 25 सप्टेंबर मध्ये चौकशी समिती गठीत करण्यात आली सदर चौकशी समितीने 30 सप्टेंबर रोजी चौकशी करून पाच ऑक्टोबर रोजी समितीने शिक्षणाधिकारी वैशाली ठक यांना चौकशी समितीचा अहवाल सादर केला परंतु सदर अहवालात दिशाभूल करणारा असून या विरुद्ध मी फौजदारी दाखल करणार असल्याचे अरुण पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहे दी पी ई एस हायस्कूल पिंपळखुटा चौकशी अहवालात असे नमूद आहे की तांदूळ साफसफाई करता एका खोलीतून दुसऱ्या खोलीत मिळण्याकरता बोलेरो पिक अप गाडी आली होती शाळेच्या इमारतीची लांबी ही असते ते 90 फुटांपेक्षा जास्त नाही अशा परिस्थितीत एका खोलीतून दुसऱ्या खोलीत साफसफाई करण्यासाठी बोलेरो गाडीचा आधार म्हणजे दडपण्याचा हा प्रकार चौकशी समितीने करून गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचा प्रकार केला आहे तसेच चौकशी करताना अहवालात नमूद पटसंख्या असलेल्या विद्यार्थ्यांचे किंवा पालकांचे बयान वाटपाबाबत नोंदविले नाही संसर्ग होऊ नये म्हणून शालेय पोषण आहार वाटप बाबत शासन निर्णय आहे कि विद्यार्थ्यांना फक्त धान्य वाटप करावे धान्य शिजवता येणार नाही तसेच तूर व हरभरा हे धान्य पॅकिंगमध्ये येत असून ते साफ करण्याचा प्रश्नच येत नाही तसेच धान्य शिजवुन वाटप करण्याची परवानगी नाही तसेच खालील मुद्द्यावर गट चौकशी समितीने चौकशी केली नाही त्यामध्ये मुद्दा क्रमांक शालेय पोषण आहार अधीक्षक
कल्याणकर यांनी covid-19 संसार असताना त्यांनी दर महिन्याला शाळेला भेट देऊन गुणवत्ता दर्जा व आहार वाटप केला किंवा नाही ही खात्री करून घेणे मुद्दा क्रमांक दोन शालेय पोषण आहार साफ करण्याचे संसर्गात प्रयोजन नाही फक्त वाटप करावे तर शालेय पोषण आहार दक्षता समितीचे लक्ष करण्यात यावे असे निर्देश आहेत मुद्दा क्रमांक 3 चार चाकी गाडी लावता येत नाही ही बाब अकल्पित व आकलन न होणारी आहे किंवा कोणत्यातरी हेतू ठेवून कृती केली आहे मुद्दा क्रमांक 4सफाई ही शालेय कालावधीत अंदाजे सकाळी साडे आठ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत या कालावधीत होणे अपेक्षित आहे परंतु रात्री साडेनऊ वाजता साफ-सफाई च्या नावाखाली मालवाहू गाडी भरणे म्हणजे शालेय पोषण आहाराचे धान्य चोरी करण्यात येत होते असा आरोप अरुण पाटील यांनी केला आहे मुद्दा क्रमांक पाच चार चाकी गाडी लावण्यासाठी किमान केंद्र प्रमुखाची तरी परवानगी घ्यावी लागते तसे येथे झाले नाही मुद्दा क्रमांक सहा चौकशी समितीने चौकशी करीत असताना विद्यार्थी किंवा पालकांच्या भयानक घेतले नाही मुद्दा क्रमांक सात चौकशी अहवाल घटनाही सात वाजताची नमूद आहे तर पोलिसांच्या पंच नामामध्ये घटनेचीची वेळ ही नऊ वाजून पंचेचाळीस वाजता व पंचनामा23 वाजाताचाआहे म्हणजेच प्रकरण दडपण्याचा प्रकार केला असल्याचा आरोप अरविंद पाटील यांनी केला आहे मुद्दा क्रमांक आठ जणांना शिजवण्याची कॉलेजमध्ये परवानगी नाही तर साफसफाई करण्याचा प्रश्नच येत नाही असे उपयुक्त मुद्द्यावर समितीने चौकशी न करता आरोपी मुख्याध्यापक संदीप चव्हाण घोडके यांना वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे शालेय पोषण आहार अधीक्षक कल्याणकर समिती अध्यक्ष गटशिक्षणाधिकारी सर्व पोषण आहार अधीक्षक ,केंद्र प्रमुख रफतखान यांच्यावर गुन्हेगारांना पाठीशी घालण्यात अरुण पाटील यांनी केला असून यामध्ये सखोल चौकशी करून पुन्हा यामध्ये पून्हा सर्वे करावा आणि संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी करून अरुण पाटील यांनी यामध्ये संशय व्यक्त केला आहे जर संबंधितावर कारवाई झाली नाही तर यामध्ये गुन्हे दाखल प्रयत्न प्रयत्न केला जाईल आणि तीव्र आंदोलन छेडू असा इशारा सुद्धा पाटील यांनी येथील पत्रकार परिषदेमध्ये दिला आहे यावेळी शहरातील गण मान्य पत्रकार मंडळी उपस्थित होती.
