लोणार प्रतिनिधी शेख. सज्जाद
सद्या शेगाव ते पंढरपूर रस्त्याचे काम सुरू आहे या मध्ये लोणार शहरा मधून काही दिवसा पासून रुंदीकरनाचे काम सुरू आहे हे काम अत्यांत निकृष्ट व अंदाजपत्रक ( इस्टीमेट )नुसार होत नसून काही तरी थुतर मुतर खोदकाम करून त्याच्यावर तसाच मुरूम टाकून दाबण्यात येत आहे तसेच हे खोदकाम करतांना नगरपरिषद ची गावातील पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन ही बऱ्याच ठिकाणी पूर्ण तुटली आहे तसेच अनेक नागरिकांनी घेतलेलं घरघुती नळ कनेक्शन सुद्धा तुटले आहे ती दुरुस्त न करता तशीच दाबण्यात येत आहे या संबधी नगरपरिषद ला
कंत्राटदार यांनी कोणतीच कल्पना दिलेली नाही तरी या सर्व कामाची कॉलेटी मार्फत चोकशी करून निकृष्ट काम करणाऱ्या व कंत्राटदार याच्या वर कार्यवाही करावी व तोडलेली पाईपलाईन त्वरित जोडणी करून द्यावी जेणे करून नागरिकांना त्रास होणार नाही या वेळी नगरसेवक संतोष मापारी,गुलाबराव सरदार,सतीश राठोड,गोपी आखाडे,भारत राठोड सह अनेक नागरिक उपस्थित होते.सोबत फोटो फुटलेल्या पाईपलाईन चा
