प्रतिनिधी
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात युवासेना व शिवसेना पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण व स्पर्धा परीक्षा शिबिराचे आयोजन संपन्न झाले अध्यक्षस्थानी जळगाव जिल्ह्याचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ श्री मनोहर पाटील होते तर प्रमुख पाहुणे व शिबिरासाठी मार्गदर्शक श्री गोपाल दर्जी सर यांनी मार्गदर्शन केले तसेच जामनेर ची मातीही
पावरफुल आहे येथे पोलिस भरतीत शंभर तरुण पोलीस होतील असे त्यांनी जाहीर केले तर प्रास्ताविक विश्वजितराजे पाटील यांनी केले कार्यक्रमास सुकलाल बारी ,निळकंठ पाटील, गणेश पांढरे ,विशाल लामखेडे, अतुल सोनवणे ,एड भरत पवार, भूषण ललवाणी आदी उपस्थित होते यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते व पोलीस भरती तयारी करणारे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
