योगेश नागोलकार ता. प्रतिनिधी पातूर
राहेर:पातुर तालुक्यातील चालू वर्षाच्या खरीप हंगामामध्ये सोयाबीन बियाणे उगवण्याबाबत अडचणी येऊन शेतकऱ्यांना दुबार- तिबार पेरणी करावी लागली.मोठया प्रमाणात तक्रारी झाल्या राज्यात विविध भागात कपनऱ्यांवर कोर्ट केसस दाखल करण्यात आल्यात.अशातच काही कंपन्यांचे परवाने सुद्धा रद्द करण्यात आले.त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढील वर्षासाठी सोयाबीनचे बियाणे घरात ठेवावे.असे आहवान कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी धनंजय शेटे,यांनी केले आहे.
पुढीलवर्षि परराज्यातील खूप कंपन्या सोयाबीन बियाणे विकणार नाहीत. त्यामुळे पुढील हंगामात बियाणे कमी सुद्धा पडू शकते व भाव सुद्धा जास्त राहू शकतात.त्यामुळे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने घरचे बियाणे ठेवण्याबाबत जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.नुकतेच पातूर तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी यांच्या नेतृत्वात कृषी सहायक अनिल बी.सुरवाडे,यांनी शेतकऱ्यांना पातुर तालुक्यातील ग्रामीण भागात या या गावी गावी आहवान केले बाबुळगाव, विवरा, सुकळी, सस्ती, दिग्रस, आलेगाव ,चरणगाव, अंबाशी, पिपळडोळी, चोंडी ,धरण, जांब, अंधारसांगवी, सोनुना ,गावंडगाव, पहाडसिंगी ,पागरताटी, पांढुर्णा ,चान्नी, सायवणी ,मळसुर, (चतारी)खेट्री, शिरपूर, चागेफळ ,पिपंळखुटा, उमरा,सावरगाव, झरंडी,(पांग्रा)राहेर,(अडगाव)या गावामध्ये दवडी देण्याच्या आहवान केले आहे.शेतकऱ्यांच्या मोबाईल वर मेसेज टाकून बियाणे ठेवण्याबाबत शेतकऱ्यांना आहवान केले आहे.यावेळी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी सोयाबीन बियाणे दरवर्षी बदलण्याची गरज नसल्याचे प्रतिपादन केले.सोयाबीन बियाणे थ्रेशिंग करताना टँक्टरचे आरपीएम ४०० ठेवून मळवी करावी बियाणे सुकवून ओलावा १३ते१४टक्के ठेवून सुकवून द्यावे व जास्त उंच थप्पी लावून ठेवू नये.याबाबत मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले जात आहे. कृषी विभागाने ग्रामीण भागात केले आहे.
