Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

राहेर येथे आभाळ भरल्याने शेतकऱ्यांना मध्ये धास्ती

Responsive Ad Here

योगेश नागोलकार तालुका प्रतिनिधी पातूर

राहेर:पातूर तालुक्यातील राहेर (अडगांव)परिसरात  ७ ऑक्टोंबर रोजी दुपारी अचानक आभाळ भरून आल्याने शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाल्याचे चित्र दिसून आले आहे. यामुळे या भागात सुरु  असलेल्या सोयाबीन कापणीत विलंब निर्माण झाला आहे. अतिवृष्टीच्या पावसानंतर मागील काही दिवसांपासून राहेर भागात पावसाने विश्रांती घेतली आहे.त्यामुळे या काळात सोयाबीन कापणी व मळणीचे काम वेगात सुरू आहे.येणाऱ्या काळात ११ ऑक्टोबर नंतर पुन्हा पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.

यामुळे सोयाबीन कापणी व मळणी फुटलेला कापूस वेचणी हळदीला ब्लिचिंग इत्यादी कामे आटोपून घेण्यासाठी शेतकरी करीत आहेत. अति दृष्टीच्या पावसाने खरीप पिकाचे अतोनात नुसकान झाले आहे. या पावसातून वाचलेले सोयाबीन कापणी करून थोडाफार आधार मिळण्यासाठी धडपड सुरू आहे. पण पुन्हा आभाळ गच्च भरून आल्याने कापून टाकलेले सोयाबीन पीक ताडपत्री व प्लास्टिक द्वारे झाकण्यासाठी शेतकरी धावपळ करीत आहेत अनेकांनी पावसाचे भीतीने कापलेले तेवढेच मळणी करून घेण्यासाठी तयारी सुरू केली यात आता कापलेले सोयाबीन भिजले तर ते तेही हातातून जाईल या चिंतेत ग्रामस्थ शेतकरी भयभिंत झाले आहेत.