Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुस जप्त

Responsive Ad Here

प्रतिनिधी औरंगाबाद @ दत्ता जाधव   

पोलीस स्टेशन चिकलठाणा , औरंगाबाद ग्रामीण येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी ययांना  दिनांक १०/१०/२०२० रोजी गोपनीय माहिती मिळाली कि , वरुड काजी ते गंगापुर जहागीर रोडने एक इसम निळ्या रंगाचे मोटार सायकवर बसुन गावठी कट्टा पिस्टल घेवुन जात आहे.अशी माहिती मिळाल्यावरुन पोलीस व पंच असे गंगापुर जहागीर शिवारात सारा स्वपनांगन सोसायटी जवळ रोडवर ० ९ .१० वाजता एक इसम वरुड कडुन गंगापुर जहागीर कडे येत असतांना दिसल्याने नमुद 

इसमास पंचा समक्ष थांबवुन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव गाव व वय १८ वर्षे असे सांगीतले.त्यावेळी पंचा समक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला एक गावठी कट्टा पिस्टल व त्यामध्ये दोन जिवंत काडतुस व दोन मोबाईल , त्याचे ताब्यातील निळ्या रंगाची शाईन मोटार सायकल क्रमांक एम.एच .२० ई.व्हि.९९ ८० असा  मुद्देमाल मिळुन आल्याने त्याचा सविस्तर जप्ती पंचनामा करुन नमुद मुलाचे वयाबाबत पुरावा हस्तगत करुन खात्री केली असता त्याचे वय साडेसतरा वर्षे असे असल्याने नमुद विधीसंघर्षग्रस्त बालका विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला . 



 

सदरची कामगिरी मा . पोलीस अधिक्षक श्रीमती मोक्षदा पाटील , अपर पोलीस अधिक्षक श्री.गणेश गावडे , उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.विशाल नेहुल यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि श्री.महेश आंधळे , पोउपनि गणेश राऊत , पोलीस हवालदार / अजित शेकडे , गणेश मुळे , पोना / रविंद्र साळवे , पोना / सोपान डकले , पोकॉ / दिपक सुरोशे , पोकॉ / आण्णा गावंडे , पोना / देविदास सास्ते , दिपक देशमुख यांनी केली आहे