प्रतिनिधी औरंगाबाद @ दत्ता जाधव
मराठवाडा वृत्तपत्र छायाचित्रकार संघटनेचा प्रथम वर्धापनदिन गुरूवारी दि.15 शहरातील निरालाबाजार येथील तापडिया नाट्य मंदिरात उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी जेष्ठ छायाचित्रकार चाल्स आब्री, किशोर निकम, भिमाशंकर नावंदे, हुसेन जमादार, बसवराज जिभकाटे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते केक कापून क्रार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी विविध मान्यवरांनी सदिच्छा भेट देऊन मराठवाडा वृत्तपत्र छायाचित्रकार संघटनेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मनसे नेते सुहाना दाशरथे ,संदिप कुलकर्णी, माजी नगरसेविका किर्ती शिंदे, अश्पाक कुरेशी. आयबीएन लोकमतचे सिद्धार्थ गोदाम यासह विविध मान्यवर, वरिष्ठ सहकारी पत्रकार. सहकारी छायाचित्रकार, अधिकारी व कर्मचारी, संस्था व संघटना यांनी वर्धापन दिन कार्यक्रमाला हजेरी लावली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून हा वर्धापन दिन साजरा करण्यात आल्याचे संघटनेचे अध्यक्ष बाळू देशमुख यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष सावेश जाधव, सचिव शाम पलाये यांच्यासह सदस्यांनी परिश्रम घेतले.

