पी. आर. पोटे कृषी महाविद्यालयाचा ग्रामीण जागरूकता कार्यक्रम
अमरावती, दि. १४ : जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पाळा व रामगाव येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित पी. आर. पोटे पाटील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी श्रेया राजु मकेश्वर हिने ग्रामीण
जागृकता कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेती पीक पद्धती, पिकांची लागवड, खते-बिबियाणे,कीटकनाशकांच्या वापर आदी संदर्भात प्रात्यक्षिक दाखवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या शंकेचे निरसन करून प्रश्नांची सोडवणूक केली.
महाविद्यालयाच्या कृषी पदवी विद्यार्थीनीकडून शेतकर्यांना पारंपारिक शेती पद्धती व त्यातील बदलाविषयी माहिती करून दिली. कृषिकन्या श्रेया राजु मकेश्वर प्रत्यक्ष कृतीतून शेतकऱ्यांना निंबोळी अर्क बनवणे, चारा प्रक्रिया, शंखी, भावी उद्रेकीय किड जागृकता व व्यवस्थापन, बीज उत्पादनाचे महत्त्व व पद्धत, मृदा आरोग्य व खत व्यवस्थापन, गोठ्याची स्वच्छता व निगा राखणे, फवारणी मात्रा बनवणे, सोयाबीन बीजोत्यापण प्लॉट, शास्त्रीय पद्धत लागवड तंत्र, नर्सरी भेट व चर्चा , शेततळी आदीबद्दल उपयुक्त माहीती दिली.
बीज प्रक्रिया , माती परीक्षणचे फायदे, एकात्मिक तण व्यवस्थापन, सूक्ष्म सिंचन पद्धती, शेतीला इंटरनेटशी जुळवून पारंपारिक शेतीत कसा बदल साधता येतो व कृषी संबंधित विविध ॲपचा वापर गुलाबी बोंडअळी बद्दल जागृकता इत्यादीसाठी प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले.
या उपक्रमाबद्दल पी. आर पोटे. पाटील संकुलाचे अध्यक्ष मा. प्रविणभाऊ पोटे, उपाध्यक्ष दिलीप निंबोरकर व संस्थेचे डायरेक्टर लाडके सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या कार्यक्रमाकरिता कॉलेजचे प्राचार्य डॉ एस एन देशमुख ,उपप्राचार्य प्रा. खाडे सर (कृषीविस्तार शिक्षण) ,कार्यक्रम समन्वयक कळसकर सर (वनस्पती रोगनिदानशास्त्र) ,कार्यक्रम अधिकारी डॉ गावंडे मॅडम (उद्यानविद्या) ,विषय तज्ञ प्रा. देशमुख सर (पशु विज्ञान )प्रा. चौधरीसर( वनस्पति शास्त्र)प्रा.शिंदे मॅडम (कृषिशास्त्र) प्रा.त्रिपाठी मॅडम (कृषी अर्थशास्त्र) प्रा.निंबाळकर मॅडम (कीटकशास्त्र) प्रा.देशमुख मॅडम(मृदा विज्ञान) प्रा.अढाऊ सर (कृषी अभियांत्रिकी)व प्रा.सोनुकले मॅडम हे कृषीकन्याला प्रात्यक्षिकांसाठी मदत व मार्गदर्शन केले आहे. शेतकऱ्यांची सुद्धा कृषीकन्याना प्रात्यक्षिकांकरिता चांगले सहकार्य व साथ मिळत आहे.

