Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळाली पिक विम्याची रक्कम

Responsive Ad Here

 प्रतिनिधी हिवरखेड जितेश कारीया

या वर्षीच्या उन्हाळ्यात प्रचंड तापमानामुळे केळी उत्पादक शेतकर्‍यांच्या पिकांना चांगलाच फटका बसला होता आणि केळी बागांमध्ये अतोनात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसानीच्या व्यथा अनेक वर्तमानपत्रांमध्ये प्रामुख्याने प्रकाशित झाल्या होत्या. या बातम्यांची दखल घेत विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ हिवरखेड च्या माध्यमातून पत्रकार भवन हिवरखेड येथे शेतकऱ्यांसोबत आढावा बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतीतील पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली होती. यावेळी त्यांनी सर्व शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्यानंतर मी सर्वतोपरी प्रयत्न करून शेतकऱ्यांना केळी चा पिक विमा मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने त्यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला होता. मागील दोन ते तीन  दिवसांपूर्वी केळीचा पिक विमा काढलेल्या शेकडो शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्‍टरी 40 हजार रुपये प्रमाणे पीक विम्याची रक्कम जमा झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

प्रतिक्रिया

आ. अमोल मिटकरी आणि अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या सर्व पत्रकारांच्या सतत पाठपुराव्यामुळे आम्हा सर्व केळी उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाला आणि पीक विम्याची रक्कम खात्यात जमा झाली.

नितीन वानखडे, केळी उत्पादक शेतकरी, हिवरखेड.