Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन

Responsive Ad Here

नंदकिशोर इंगळे प्रतिनिधी अमरावती

खाजगी क्षेत्रात असलेल्या रोजगाराच्या संधी शोधून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे दृष्टीने पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.  इच्छूक उमेदवारांनी 19 ऑक्टोबरपर्यंत www.rojgar.mahaswayam.gov.in  या वेबपोर्टलवर नोंदणी करून मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था  यांच्या संयुक्त  विद्यमाने आयोजित मेळाव्यात 234 रिक्तपदे अधिसूचित झाली आहेत. या मेळाव्यात पात्र उमेदवारांची मुलाखतीव्दारे निवड होणार असून विविध कंपनीच्या आस्थापनेवर नियुक्ती देण्यात येणार आहे.  

       धुत ट्रान्समिशन प्रायव्हेट लिमिटेडया कंपनीत- ट्रेनी (पुरुष/स्त्री) 50 रिक्त पदासाठी इयत्ता एसएससी/एचएससी/एचएससी-एमसीव्हीसी/डिप्लोमा/पदवीधर पात्रता आहे. ईसीई इंडिया एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड  -प्रोजेक्ट ॲन्ड सर्व्हिस इंजिनिअर (पुरुष/स्त्री) 1 पदासाठी डिप्लोमा इन इंजिनिअर इलेक्ट्रिक/ इलेक्ट्रॉनिक्स किंवा बी.ई इलेक्ट्रीक/ इलेक्ट्रीनिक्स पात्रता आहे. श्री चक्रधर एजन्सी अमरावती  येथे सेल्स एक्झिक्युटिव्ह (पुरुष) 20 पदासाठी आय.टी.आय.कोणत्याही ट्रेड पास आवश्यक आहे, तसेच ट्रॅक्टर मॅकेनिकल  (पुरुष) 05  आय.टी.आय (ट्रॅक्टर मॅकेनिकल) ट्रेड आवश्यक आहे.श्री संत अच्युत महाराज हदय रुग्णालय आणि संशोधन अमरावती येथे - ट्रेनी नर्स(स्त्री) 08 पदासाठी डिप्लामा इन जीएनएम पात्रता आहे. यशस्वी ॲकॅडमी कौशल्य पुणेसाठी येथे ट्रेनी (पुरुष/स्त्री) 50 पदासाठी आय. टी. आय. कोणताही ट्रेड पास आवश्यक आहे. पियागो वाहन प्रा. लि. पुणे येथे ट्रेनी (पुरुष/स्त्री) 50 पदाकरीता इयत्ता दहावी उत्तीर्ण अशी पात्रता आहे. टेक्नॉक्राफ्ट प्रा. लि. नांदगाव पेठ अमरावती (स्त्री) 50 पदाकरीता इयत्ता दहावी उत्तीर्ण अशी पात्रता आहे. सदर मेळाव्यामध्ये केवळ ऑनलाईन पध्दतीने सहभाग नोदविणाऱ्या उमेदवारांनाच नोकरीची संधी प्राप्त होणार आहे. जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगारांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक प्रफुल्ल शेळके आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मंगला देशमुख यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.