शरद अवचार @ ग्रामीणप्रतिनिधी
सविस्तर वृतांत अशे कि मा उप विभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उप विभाग मेहकर यांना रिपब्लिकन सेना च्या वतीने लेखी निवेदन सादर करून भाई महेंद्र पनाड रिपब्लिकन सेना तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्ववात भाई अशोक जावळे कार्य अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते दादाराव पना ड यांनी दि 12/10/2020पासून मोजे सुलतानपूर येथील श्रीहरी कन्ट्रक्शन समोर आमरण उपोषण सुरु केले आहे उपोषण करते यांचे मत अशे आहे कि श्रीहरी कन्ट्रक्शन कंपनीनेने वाहनाद्वारे ओव्हर लोड वाहतूक करून सुलतानपूर ते वेणी रोडवरील सुलतानपूर ते श्रीहरी कन्ट्रक्शन प्लॅनट पर्यंत रस्त्याची दयनीय अवस्था केली आहे त्या वरील गड्या मध्ये माती मिश्रित मुरूम वारंवार टाकून गेल्या चार वर्षा पासून अमर्याद प्रदूषण करत आहेत त्यामुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ त्रस्त झाले आहे सदर रस्त्याचे कंपनी कडून तात्काळ काँक्रीटीकरण करून रस्ता बांधण्यात यावा या आशयाने निवेदन आम्ही आपणास दिले होते आपण आमच्या निवेदनाची कोणतेही दखल घेतली नाही आमच्या माहिती नुसार सुलतानपूर ते वेणी रस्त्याची वर्क ऑर्डर समंधित ठेकेदारास बऱ्याच दिवपासून दिलेली आहे तरी सुद्धा बांधकाम अध्याप सुरु केलेले नाही समंधीतांणी रस्त्याचे बाजूने काही ठिकाणी धातुर मातुर खोदकाम करून त्यामध्ये काही ठिकाणी माती मिश्रीत मुरूम भरला आहे याची दबाई वेवस्तीत करण्यात आली नाही टेंडर मध्ये नमूद कालावधी पेक्षा अधिक कालावधी उलटून गेला आहे तरी अजून सुद्धा बांधकामाला सुरवात देखील झालेली नाही जो पर्यंत सुलतानपूर ते वेणी रस्त्याचे बांधकाम सुरु होणार नाही तो पर्यंत आमचे आमरण उपोषण सुरूच राहील अशे उपोषण कर्ते यांनी म्हटले आहे.
