किरण वाघ प्रतिनिधी बुलढाणा
बुलढाणा येथील कृषी केंद्रांवर हरभरा बि अनुदान मिळत नसल्याचे समस्या शेतकऱ्यांनी अनिल जगताप यांच्याकडे मांडली होती त्याचा पाठपुरावा करत अखेर वैभव कृषी केंद्र येथे भेट देऊन शासनाचा जीआर दाखवून चर्चा करण्यात आली यशस्वी चर्चेनंतर दोन दिवसा पासून प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना हरभरा बी अनुदानावर वाटप झाले .
याबाबत सविस्तर वृत्त असे की हरभरा बी वर अनुदान मिळत नसल्याने त्रस्त झालेले शेतकरी बांधव यांनी अनिल जगताप यांच्याकडे आपली समस्या मांडली. या शेतकऱ्यांच्या ज्वलंत समस्येची दखल घेत आज सकाळी वैभव क्रुषि केंद्रावर जावून शासनाचा जियार दुकानदारानां दाखविला . त्यांना नंतर चर्चा केली व प्रत्येक शेतक यांना 3 बॅग प्रमाणे वाटप करण्यात आले . एक बॅक २0 किलो . एक हजार प्रमाणे अनुदानावर देण्यात .आल्या या वेळेस . रामदास जगताप , बळीराम पाटील , संजय इंगळे , सुरेश जगताप , इत्यादी शेतकरी उपस्थीत होते . शेतकऱ्यांची समस्या सोडल्यामुळे शेतकरी वर्गात आनंद निर्माण झाला असून त्यांनी अनिल जगताप यांचे धन्यवाद मानले.
