किरण वाघ प्रतिनिधी बुलढाणा
उत्तर प्रदेश मधील हाथरस जिल्ह्यातील दलित परिवारातील 19 वर्षीय मुलीवर काही गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी अमानुष बलात्कार केला ते गावगुंड फक्त बलात्कार करून शांत बसले नाही तर तिचे हाडेही तोडली गेली. ती ह्यात नसली तरी मृत्यूआधी पोलिसांना दिलेल्या जबानीत सर्वकाही कथन केले आहे त्यानंतर पोलिसांनी ताबडतोब त्या गाव गुंड प्रवृत्तीच्या युवकांना अटकही केली. असल्या गाव गुंड प्रवृत्तीच्या नराधमांना कायद्याने फास्टट्रॅक न्यायालयात दाखल करून त्यांना कठोर
शिक्षा द्यावी असे निवेदन युवा भिमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने भाई वैभव वानखेड यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालय देऊन योगी सरकार चा जाहीर निषेध करण्यात आला आहे यावेळी उपस्थित ता,अध्यक्ष अमोल भाई वाकोडे संघर्ष वानखडे शुभम ढवले जिल्हा अध्यक्ष शिव छावा संघटना, राहुल ढवळे राहुल रणीत युवराज सुरडकर अविनाश वानखडे रोशन रक्षक नरेश मोजपुरे आकाश खंडारे रोहन वानखडे राज वानखडे कैलास खंडारे भूषण वानखडे उज्ज्वल निकम मंगेश वारे सुशील ठाकरे.तरी सर्व समाज बांधव पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते
