लोणार सज्जाद शेख
तालुक्यामधील बिबखेड येथील पोलीस पाटील अंकुश मोहन चव्हाण यांना मेहकर उपविभागीय अधिकारी गणेश राठोड यांनी एका आदेशान्वये निलंबित केले आहे.
बिबखेड येथील पोलीस पाटील अंकुश चव्हाण यांची तक्रार सुभाष धोंडू राठोड व इतर ग्रामस्थांनी राज्याच्या गृहमंत्रालया सहित संबंधित विभागाकडे करण्यात आली होती तक्रारीमध्ये नमुद्प्रमाणे सदर पोलीस पाटील गावात अशांतता पसरवत असून ग्रामस्थांवर दादागिरी करत मारहाण करत होता तसेच गावात येणारे किरकोळ विक्रेते व्यापाऱ्याला त्रास देत होता तसेच त्याचे वर विविध कलमाद्वारे लोणार पो.स्टे. ला गुन्हे दाखल झाले होते या तक्रारीची राज्याच्या गृहामंत्रालयाने दखल घेत मेहकर उपविभागीय अधिकारी गणेश राठोड यांना चौकशीचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने सखोल चौकशी करत महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 चे कलमानुसार पुढील आदेश पावेतो बिबखेड येथील पोलीस पाटील अंकुश मोहन चव्हाण यांना मेहकर उपविभागीय अधिकारी गणेश राठोड यांनी निलंबित केले असून निलंबन काळात शासनाकडून त्यांना कोणतेही मानधन मिळणार नाही व त्यांचा पुढील प्रभार राजेश्वर काशीराव चव्हाण पोलीस पाटील कीन्ही यांचे कडे हस्तांतरित करण्यात यावा असे ही आदेशात नमूद आहे.