Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

कोवीड सेंटरमधील सफाई कामगार, आरोग्य सेविका, महिलाच, खऱ्या शाहूंच्या विचारांच्या वारसदार

Responsive Ad Here

प्रतिनिधी सिंधुदुर्ग

जगभर कोरोना रोगाने हाहाकार माजवला . या महामारीच्या  काळात कोवीड सेंटर मधील सफाई कामगार, आरोग्य सेविका आणि  महिला सेविकांनी आपल्या कुटूंबाची जबाबदारी सांभाळीत, व कोरोना रोगाची योग्य ती खबरदारी घेत  कोवीड सेंटर मधील रुग्णांची सेवा केली त्यांचे मनोबल वाढविले म्हणूनच कोल्हापूर जिल्ह्यात हा रोग आटोक्यात आला.यापुर्वी राजर्षी शाहू महाराज यांनी प्लेगच्या साथीत नागरिकांची काळजी घेत कमीत कमी नुकसान होईल याची दक्षता घेतली होती. त्याच तोला मोलाचे काम कोवीड सेंटर मधील डॉक्टर ,अधिकारी ,  सफाई कामगार, आरोग्य सेविका व महिलांनी केले आहे.छ शाहू महाराजांचे स्मरण व्हावे असे काम त्यांच्या हातून झाले आहे.त्यामुळे त्याच शाहूंच्या विचारांच्या खऱ्या वारसदार आहेत  असे प्रतिपादन भाजपा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष समरजित राजे घाटगे यांनी व्यक्त केले.

 राधानगरी  कोवीड सेंटर  येथील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी व सेंटर कडील कोविड योध्ये यांचे मनोधैर्य वाढावे या उद्देशाने कोविड सेंटर ला भेट दिली.त्यावेळी ते बोलत होते, या दौऱ्यात कोविड सेंटरमधील रुग्णांच्या प्रकृतीची रूग्ण खोलीत जाऊन विचारपूस केली व कोरोनामुक्त होण्यासाठी शुभेच्छा दिल्या तर वैद्यकीय अधिकारी, स्वच्छता कर्मचारी, महिला सेविका,पत्रकार, पोलीस कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी यांच्याशी संवाद साधला.त्यांना काही अडचणी असतील तर त्या शासनाला कळवून सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्याचे वचन दिले .यावेळी सर्व कोरोना योध्याचा सत्कार  श्री घाटगे यांच्या हस्ते  करण्यात आला. या सत्काराने सर्व कर्मचारी भारावून गेले.

       भेटीवेळी भाजपा राधानगरी तालुकाध्यक्ष संभाजी आरडे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल देसाई, माजी जि.प.सदस्य भुषण पाटील, सरचिटणीस विठ्ठल पाटील, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख महेश पाटील, मागासवर्गीय आघाडी जिल्हाध्यक्ष दिपक शिरगावकर, सांस्कृतिक आघाडी चे सुनिल लिंगडे, राधानगरी चे वैद्यकीय अधिकारी डॉ. गणपती गवळी, आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र शेट्ये, धनाजी पाटील, अविनाश कुंभार,राजू चव्हाण, गटविकास अधिकारी डॉ.उदय पाटील , भाजप चे राधानगरी तालुका कोषाध्यक्ष सुनील चौगले, सरचिटणीस विलास रणदिवे, संतोष कातिवले, जेष्ठ नेते डॉ.सुभाष जाधव,मनू कांबळे, राशिवडे सरपंच कृष्णात पोवार , शहराध्यक्ष संजय पोवार, युवा मोर्चा चे विनायक भोई, स्वप्निल जरग,अमर बावडेकर, विकास पाटील,स्वप्निल पातले, सखाराम भितम , सुनिल इंगवले  आदी सह मोजकेच कार्यकर्ते , आरोग्य कर्मचारी व रुग्णनातेवाईक उपस्थित होते.