सतिष बोरसे प्रतिनिधी धरणगाव
ओबीसी ही जात नसून एक वर्ग आहे. ओबीसी समाजाला १७ टक्के आरक्षण आहे. हे आरक्षण हजारो वर्षे ज्या जातींवर जुलुम झाला त्या जातींना सक्षम करण्यासाठी आहे. राजर्षी शाहू महाराजांनी राज्यकर्ते म्हणून आरक्षण दिले होते त्यानंतर अनेक वर्षांनी आदरणीय खा. शरद पवार साहेबांनी आरक्षण दिले याची आठवण यावेळी ना. छगन भुजबळ यांनी करुन दिली.
ओबीसी समाज ४०० जातींमध्ये विभागला गेला आहे. हा दबलेला समाज आहे पण त्याने आता संघटीत व्हायला हवे. आपण एकत्रितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात समाजासाठी काम करायला हवे कारण आपला नेता हा सर्वांचा विचार करणारा, सर्व समाजघटकांना न्याय देणारा नेता आहे. सर्वच क्षेत्रात आदरणीय पवार साहेबांनी आपला ठसा उमटवला आहे. महाराष्ट्रावर कोणतेही संकट येऊ दे पहिल्यांदा तिथे धावणारा असा आपला नेता आहे. त्यामुळे पवार साहेबांना शक्ती देऊया, आपल्याला शक्ती मिळाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन छगन भुजबळ यांनी केले.विविध ठिकाणी नावाचे बोर्ड लावून किंवा कार्ड छापून काही होणार नाही. त्यामुळे तुम्हाला ओळख मिळणार नाही, म्हणून जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी काम करा, असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले.