सतिष बोरसे प्रतिनिधी धरणगाव
महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती धुळे तर्फे पाकीजा उस्मान पटेल राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त यांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव करण्यात आला .तसेच के.जी.एन. सोशल सर्विस दिल्ली या संस्थेतर्फे पीस मेसेंजर अवार्ड म्हणून सन्मानित करण्यात आले. महात्मा गांधी यांच्या 151 व्या जन्मशताब्दीनिमित्त पुरस्काराने गौरविण्यात आले.
पाकिजा पटेल यांनी शाळेत, परिसरात, विभागात ,देशासाठी सामाजिक बांधिलकी ठेवून कोरोना या राष्ट्रीय आपत्तीत गोरगरीब जनतेला मदत करून जीवाची पर्वा न करता अहोरात्र केलेले परिश्रम व सामाजिक कार्याबद्दल महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्गमित्र समितीतर्फे कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. पाकिजा पटेल यांना कोरोना योद्धा सन्मान व पीस मेसेंज अवार्ड मिळाल्याने पुन्हा एकदा उंच भरारी घेतली आहे या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
