प्रदिप रघुते अमरावती नांदगांव (खंडेश्वर
अमरावती येथील युवा शेतकरी अतुल सुभाषराव चौधरी (३२ वर्ष) यांनी दि ८ ऑक्टोबर २०२० गुरुवार रोजी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.चौधरी यांनी आपल्या ४ एकर शेतात सोयाबीन व तूरीची पेरणी केली होती. सतत सुरु असलेल्या पावसाने नाकी नव आणले आहे ,,समोर येणारे पिक हे शेतकरी वर्गासाठी जोमात असते मात्रं निसर्गाच्या लहरीपणाने कोमात गेले.अशात अतुल वर यांच्यावर ८८ हजार रुपयांचे राष्ट्रीकृत बँकेचे कर्ज होते. कर्जाच्या विचाराने व आता परिवारांच काय होणार कर्ज कसं फेडणार अशा नापिकीमुळे त्यांनी आत्महत्या केली आहे अशी चर्चा आहे.
संबंधित शेतकऱ्यांच्या परिवाराचे सांत्वन करण्याकरिता राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष मनोज गावंडे यांनी त्याठिकाणी भेट दिली व सविस्तर चर्चा केली. यावेळी वैभव भोयर, विनोद धुमनखेडे,राजेश भोयर उपस्थित होते. तालुका अध्यक्ष मनोज गावंडे यांनी शासना कडुण जितकी मदत होईल तितके आत्महत्या ग्रस्त कुटुंबाच्या पाठीशी राहुण प्रयत्न करु असा धिर दिला.
