Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

नांदुरा येथे महाराष्ट्रातील महिला अत्याचारांविरोधात भाजपाचे 'आक्रोश' आंदोलन

Responsive Ad Here

देवानंद नेमाने प्रतिनिधी नांदुरा

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर महिलांवरील अन्याय-अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असून राज्यात महिला सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. महाराष्ट्रासारख्या शांत व सुसंस्कारीत राज्यासाठी सदर बाब भूषणावह नाही. प्रशासनावर अंकुश नसल्याने कोरोना विलगीकरण केंद्रातही महिला सुरक्षिततेच्या बाबतीत राज्य शासन पूर्णपणे अपयशी ठरलेले असून त्याठिकाणी महिलांवर अत्याचार व छेडछाड झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. अशा घटनांना वाचा फोडण्यासाठी व त्यावर 


असंवेदनशील राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच राज्यातील कोरोना विलगीकरण केंद्रात महिलांच्या सुरक्षिततेसाठी एसओपी तयार करावी या आशयाचे निवेदन नांदुरा भाजपाच्या वतीने आज सोमवार, दि. १२/१०/२०२० रोजी शहराध्यक्षा सौ. सारिका राजेश डागा यांच्या नेतृत्वात मा. तहसीलदार साहेब यांना देऊन नांदुरा तहसील कार्यालयासमोर 'आक्रोश' धरणे आंदोलन करण्यात आले. महिलांवरील या अत्याचारांना कायमचा पायबंद घालण्यासाठी राज्य शासनाने  तातडीने ठोस पावले उचलून महिला संरक्षणाची जबाबदारी गांभीर्याने पार पाडावी असे या निवेदनात म्हटले आले.यावेळी भाजपा महिला आघाडी तालुकाध्यक्षा प्रज्ञाताई लासुरकर, शहराध्यक्षा सारिकाताई डागा, रेनू ताई डागा जिला सोशल मीडिया संयोजिका,

नगरसेविका शुभांगी झांबरे, नगरसेविका ज्योतीताई डांगे, माजी नगराध्यक्षा मंगलाताई मुर्हेकर, महिला आघाडी उपाध्यक्षा तुळसाताई पांडव, सरचिटणीस अनिता चौधरी, महिला आघाडी सचिव सरिता बावस्कार, बेटी बचाओ-बेटी पढाओ शहर संयोजिका ज्योती तांदळे, कांचन बावस्कर, लता ठोंबरे, आढोलकर ताई, सुनिता पांडव तसेच तालुकाध्यक्ष संतोषभाऊ मुंढे, शहराध्यक्ष श्यामभाऊ राखोंडे, युवा मोर्चा अध्यक्ष गजानन चांभारे, जिल्हा सरचिटणीस गणेश भोपळे, गजानन पाटील, उपाध्यक्ष प्रमोद हिवाळे, नगरसेवक प्रमोद खोंड, सरचिटणीस ब्रह्मानंद चौधरी, उमेश ताकवाले, पं. स. सदस्य प्रभाकरभाऊ वानखडे, जेष्ठ भाजपा नेते शंकरसा ताकवाले, श्री महाकाळ भाऊ, श्री विनोद बाप्पू, विनोदभाऊ भोजने, कैलाशभाऊ डांगे, विशाल मधुकरराव वडोदे, विशाल दांडगे, वाघमारे, विनायक वाकेकर यांच्यासह सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सोशल डिस्टन्सिंगच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले.