Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

आडगाव येथे वीज पडून दोन तरुणांचा मृत्यू

Responsive Ad Here

गणेश महाजन@ एरंडोल



कासोदा. तालुका एरंडोल .( प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या  आडगाव येथे शनिवारी संध्याकाळी पाच तीस वाजेच्या दरम्यान जोरदार पाऊस व विजांचा गडगडाट सुरू झाला. त्यात ढोली शिवारात कापूस वेचण्यासाठी गेलेल्या श्री रविंद्र प्रभाकर महाजन(वय 22 )व महेंद्र  उखर्डू पाटील( वय     २३)यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचे निधन झाले. दोन्ही तरुण उखर्डू पाटील यांच्या शेतात कपाशी वेचणी साठी गेले होते .संध्याकाळी अनपेक्षित जोरदार पाऊस व विजांचा कडकडाट सुरु झाला. हे वातावरण पाहून घरी येण्यासाठी तयारी करत असताना, झाडाखाली उभे असलेल्या रवींद्र महाजन व महेंद्र पाटील यांच्या अंगावर वीज कोसळली. त्यांना तात्काळ कासोदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. त्यांचे शवविच्छेदन बाकी असल्याचे डॉक्टर वाघ यांनी सांगितले. त्याबाबत पोलीस स्टेशनला ही उशिरापर्यंत गुन्हा नोंदविणे बाकी होते. एपीआय श्री जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे .या अनपेक्षित घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.✍️✍️✍️✍️