प्रमोद बलकवडे प्रतिनिधी
पंढरपूर:- कोरोना विषाणूच्या पाश्वभूमीवर मा.राज्य शासनाने दि.14/11/2020 रोजी राज्यातील सर्व मंदिरे भाविकांना दि.16/11/2020 पासून दर्षनासाठी खुले करून देणेबाबत आदेशीत केले होते. त्यानुसार श्री.विठ्ठल रूक्मिणी मातेचे फक्त मुखदर्शन आॅनलाईन बुकींग करून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे.
आज दि.26/11/2020 रोजी कार्तिकी एकादशी संपन्न होत आहे. कार्तिकी यात्रेला दरवर्षी होणारी भाविकांची गर्दी व कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळे दि.25/11/2020 ते दि.27/11/2020 या कालावधीत श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे. तथापि पंढरपूर शहरातील स्थानिक नागरिकांकडून श्रींचे दर्शन देण्याचंी मागणी होत आहे. ही बाब विचारात घेवून, उद्या शुक्रवार दिनांक 27/11/2020 रोजी सकाळी 06.00 ते रात्री 12.00 या वेळेत पंढरपूर शहरातील स्थानिक नागरिकांना श्री.विठ्ठल रूक्मिणीमातेचे मुखदर्शन उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. त्यासाठी आॅनलाईन बुकींग करण्याची आवश्यकता नाही. मात्र पंढरपूर शहरातील स्थानिक नागरिक असलेबाबतचा पुरावा (आधारकार्ड/मतदानकार्ड) सोबत आणणे आवश्यक आहे. कोरोना विशाणूच्या पाश्वभूमीवर 65 वर्षापूढील व्यक्ती, 10 वर्षाखालील मुले, गर्भवती महिला तसेच आजारी व्यक्ती यांनी दर्शनासाठी येण्याचे टाळावे.
![]() |
| File photo |
सदरचे पत्रक मंदिर समितीचे मा.सदस्य आ.रामचंद्र कदम, श्रीमती.शकुंतला नडगिरे, डाॅ.दिनेशकुमार कदम. श्री.भास्करगिरी गुरू किसनगिरी बाबा, श्री.संभाजी शिंदे, आ.सुजितसिंह ठाकूर, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर), अॅड.माधवी निगडे, ह.भ.प.प्रकाश जवंजाळ. श्री.भागवतभुषण अतुलशास्त्री भगरे गुरूजी, ह.भ.प.शिवाजीराव मोरे, सौ.साधना भोसले यांचेशी विचारविनियम करून एकमताने निर्णय घेतल्यानंतर मा.सह अध्यक्ष श्री.गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी श्री.विठ्ठल जोशी यांनी प्रसिध्दीस दिले आहे.
