लोणार दि 30 (सज्जाद शेख)-
लोणार तालुका अतिवृष्टी बाधित घोषित करत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत देण्याची मागणी लोणार भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष बाबाराव मुंडे यांचे नेतृत्वाखाली तहसीलदार सैफन नदाफ यांचेमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात नमूद प्रमाणे लोणार तालुक्यातील शेतकरी बांधवांचा एन हातातोंडाशी आलेला घास पीक कापणी वेळी आलेल्या अवकाळी पावसाने हिरावला गेला मात्र शासकीय नियमाप्रमाणे 65मी मी पाऊस पडल्यावर अतिवृष्टी ग्राह्य धरले जाते मात्र लोणार तालुक्यात सलग तेरा दिवस पाऊस सतत धार पडल्याने सर्व पिके वाया गेली जवळपास 55 मिमी पेक्षा जास्त पाऊस तालुक्यात झाला असून शासनाच्या जाचक अटीमुळे तालुका मदतीपासून वंचित राहिला आहे तरी मुख्यमंत्री महोदयांनी विशेष बाब म्हणून लोणार तालुक्याला अतिवृष्टी मध्ये समाविष्ट करत आर्थिक मदत द्यावी अशीही मागणी निवेदनात नमूद आहे निवेदन देतेवेळी भाजपा तालुकाध्यक्ष बाबाराव मुंडे तालुका सरचिटणीस प्रकाश नागरे शहराध्यक्ष गजानन अंकुश मापारी भगवानराव सानप विजय मापारी तारे मामा प्रकाश मुंडे शेख अजीम भाई गणेशराव तांगडे मारुती सुरोशे दिनकर डोळे ज्ञानेश्वर डोळे सुरेश अंभोरे बद्रीनाथ कांगणे उद्धव आटोळे सुंदर संचेती गजानन वाघ अजय गायकवाड शिवानंद मुंडे मनोज गीते विनोद थोरवे रमेश नागरे गणेश काकड दीपक चौधरी संजय पवार ईश्वर मदनकर विशाल फड सोनू जाधव गजानन सानप आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

