देवानंद नेमाने प्रतिनिधी नांदुरा
सन २०२०-२०२१ या वर्षासाठी विधानमंडळाच्या विविध समित्यांची आज घोषणा करण्यात आली. विधानसभा अध्यक्षांनी याअंतर्गत अत्यंत महत्त्वाच्या अश्या ईतर मागासवर्ग कल्याण समिती व ग्रंथालय समिती ही घोषित केली.
या समितीत मलकापूरचे कर्तव्यदक्ष आमदार श्री.राजेश एकडे यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. आमदार राजेश एकडे यांचा उपरोक्त दोन्ही अभ्यासू समित्यांन मध्ये समावेश झाल्याने मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
